आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजांवर प्रचंड दबाव असतो. पहिल्याच सामन्यात जर फलंदाजाने धुलाई केली तर कारकिर्दीचा शेवटही त्याच सामन्यात होण्याची शक्यता असते. जशी संधी फलंदाजाला परत परत मिळते तशी गोलंदाजाला मिळेलच याची काहीही शाश्वती नसते.
परंतु एवढं सगळं असतानाही गोलंदाज हे पहिल्याच सामन्यात अफलातून कामगिरी करतात. विकेट्स तर घेतातच परंतु मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ५-५ षटकं निर्धावही टाकतात.
वनडे पदार्पणाच्या सामन्यात ५ विकेट्स आजपर्यंत केवळ ३ खेळाडूंना घेता आल्या आहेत. या सर्वोत्तम कामगिरी ही बर्मुडाच्या ड्वेन लेव्हरॉक या खेळाडूच्या नावावर आहे. हा तोच खेळाडू ज्याने २००७ विश्वचषकात राॅबीन उथप्पाचा सुर मारुन झेल घेतला होता तेही १२७ किलो त्याचे वजन असताना. Stats: Most maiden overs bowled on ODI debut.
१७ मे २००६ रोजी कॅनडाविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे वनडे पदार्पण करताना त्याने १० षटकांत ५ निर्धाव षटके टाकताना १४ धावा देत १ विकेट घेतली होती.
वनडेत सर्वात पहिल्यांदा असा कारनामा सर एँडी राॅबर्ट यांनी केला होता. त्यांनी १९७५मध्ये पदार्पणाच्या वनडे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मँचेस्टर येथे खेळताना १२ षटकांत ५ निर्धाव षटके टाकत १६ धावांत २ बळी घेतले होते. तेव्हा गोलंदाज वनडेत १२ षटके टाकत असतं.
डेवोन माल्कन या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात २५ मे १९९० रोजी द ओव्हल येथे वनडे पदार्पण करताना ११ षटकांत ५ निर्धाव षटके टाकताना १९ धावांत दोन विकेट्स घेतल्या होत्या.
वनडे पदार्पणात ४ निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
वनडे पदार्पणात ४ षटके निर्धाव टाकण्याचा पराक्रम ६ गोलंदाजांनी केला आहे. त्यात पाकिस्तानचे अब्दुल कादीर व असद अली, इंग्लंडच्या नील फाॅस्टर व माईक हेंड्रिक्स, केनियाच्या इमानुअल बुंदी तर भारताच्या मोहम्मद शमीचा समावेश होतो.
शमीने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ६ जानेवारी २०१३ रोजी दिल्ली वनडेत ९ षटकांत ४ षटके निर्धाव टाकताना २३ धावा देत एक विकेट घेतली होती. अतिशय कमी धावसंख्येच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अफलातून गोलंदाजी करत पाकिस्तानला १५८ धावांत रोखत १० धावांनी विजय मिळवला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सलमान खान की एमएस धोनी? केदार जाधवने दिलं हे उत्तर
-मी मुर्ख आहे का? ३०० वनडे सामने खेळून मला काही कळतं नाही का?
-आणि म्हणून शिखऱ धवनने पंजाबी गाणे ऐकणे केले बंद