भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. काही चाहते तर त्याला गब्बर या नावानेही ओळखतात. परंतु त्याला आणखी एक बाजू आहे. त्याबद्दल सांगताना धवन म्हणाला की, कशाप्रकारे त्याने आपल्या संगीताची आवड बदलली आणि याचा प्रभाव त्याच्या खेळावर पडला.
भारतीय संघाचे लाईफस्टाईल प्रशिक्षक आणि मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाळ दास (Gaur Gopal Das) यांच्याशी इंस्टाग्रामवर झालेल्या चर्चेत धवन म्हणाला की, संगीतावरील प्रेमामुळे त्याचा खेळावर परिणाम झाला आहे.
धवन (Shikhar Dhawan)पुढे म्हणाला की, “आम्हाला नकारात्मक कमेंट्स येतात. परंतु मी कमेंट्स वाचत नाही. मी सुरुवातीला पंजाबी गाणे (Punjabi Songs) ऐकत होतो. जे आक्रमक असायचे. परंतु आता मी अशाप्रकारचे गाणे ऐकत नाही. त्यामुळेच मी शांत असतो. संगीताचाही प्रभाव माझ्यावर पडतो.”
“इतर आवाजांचा प्रभाव तुमच्यावर पडला नाही पाहिजे. हे महत्त्वाचे असते. मला आठवते की, एकदा मी आयपीएलमध्ये (IPL) शून्य धावेवर बाद झालो होतो. पव्हेलियनमध्ये जाताना मी स्वत:शीच पुटपुटलो की माझ्याकडून काय चूक झाली. परंतु मला लगेच जाणवले की, मी जितके याबद्दल विचार करेल, हे तितकेच माझ्याबरोबर राहील,” असेही धवन पुढे म्हणाला.
डावखुरा फलंदाज धवन म्हणाला की, “पुढच्या सामन्यात मी ९७ धावा केल्या होत्या.”
धवनने आपल्या आयपीएल कारकीर्दीत एकूण १५९ खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३.१७ च्या सरासरीने ४५७८धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कधीही विश्वचषक विजेतेपद नशीबात न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर्स
-चेन्नईकडून खेळलेले ३ दिग्गज, जे कुणालाही आठवत नाहीत
-आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स






