कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने काल केलेल्या ७८ धावांच्या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. परंतु याबरोबर या खेळाडूने अनेक क्रिकेट विक्रमांना गवसणी घातली.
त्यातील काही ठळक विक्रम
#१ भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानी. मोहम्मद अझहरुद्दीनला टाकलं मागे. भारत आणि आशिया अशा दोन संघांकडून खेळताना एकदिवसीय कारकिर्दीत त्याने २९४ सामन्यांत ९४४२ धावा केल्या आहेत. तर अझहरुद्दीनच्या नावावर ३३४ सामन्यांत ९३७८ धावा आहेत.
#२ एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी चामिंडा वास आणि शॉन पोलाक हे खेळाडू आहेत. ते दोघेही ७२ वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद राहिले आहेत.
#३ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सार्वधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी सध्या चौथ्या क्रमांकावर असून सर्वाधिक आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचवा आहे. त्याच्यापुढे ३५२ षटकार मारणारा श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या हा खेळाडू असून सध्या एमएसच्या नावावर आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२२ षटकार आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०८ षटकार आहेत.
#४ सध्या धोनीच्या नावावर ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा एकदिवसीय सामन्यात ७३ वेळा करायचा विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील १४वा खेळाडू आहे.
#५ धोनीने २९४ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २०वेळा सामनावीर हा पुरस्कार पटकावला आहे. २० किंवा त्यापेक्षा जास्त वेळा एकदिवसीय सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारा धोनी हे केवळ ६वा भारतीय आहे.