कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे यापुर्वीच जाहिर करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे जगभरातल्या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अनेक मोठ्या स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या आहेत किंवा बंद दरवाजा मागे खेळवण्यात येणार आहेत. याचा अर्थ या स्पर्धांना प्रेक्षकांना हजेरी लावता येणार नाही.
जगभरातील 4000हून अधिक लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या साथीच्या रोगाने जगातील क्रीडा स्पर्धांवरही परिणाम झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या जागतिक उद्रेकावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी सर्व आवश्यक खबरदारी घेत सर्वाना व्हायरसशी लढा देण्याचे आवाहन केले.
“चला सकारात्मक राहू आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून कोरोनाव्हायरसच्या उद्रेका विरूद्ध लढा देऊ. सुरक्षित रहा, जागरुक रहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा की पुढे निस्तारण्यापेक्षा वेळेवर काळजी घेतेली बरी. कृपया सर्वांची काळजी घ्या,” असे कोहलीने ट्विट केले.
कोहली सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेत व्यस्त होता. पण ही मालिकाच कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता रद्द करण्यात आली आहे. ही मालिका रद्द होण्याआधी विराट बरोबरच अन्य खेळाडूही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क घातलेले दिसून आले होते.
त्याचबरोबर काल (13 मार्च) बीसीसीआयने आयपीएलसुद्धा 15 एप्रिलला पर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
-कोरोनाने अवघड केलं! धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सलाही बसला फटका
– Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
– ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!