बुधवारी (२३ सप्टेंबर) इंग्लंड महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात टी२० मालिकेतील दूसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ४७ धावांनी विजय मिळवला. यासह ५ सामन्यांचा टी२० मालिकेत इंग्लंडने २-०ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाची कर्णधार स्टेफनी टेलरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. Stefanie Taylor Become second Player To Cross 3000 Runs In T20I
टेलरने या सामन्यात ३१ चेंडूत २८ धावा केल्या. यात तिच्या ४ चौकारांचा समावेश होता. यासह तिने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करणारी ती आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट इतिहासातील दूसरीच खेळाडू ठरली. तिच्याआधी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची महिला अष्टपैलू खेळाडू सूझी बेट्स अव्वल क्रमांकावर आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणताही पुरुष क्रिकेटपटू हा विक्रम करु शकला नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २७९४ धावा केल्या आहेत.
स्टेफनी टेलरने जून २००८मध्ये आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून टेलरने एकूण १०५ सामने खेळले आहेत. त्यात तिने १०३ डावात फलंदाजी करताना ३०२० धावा केल्या आहेत. यात तिच्या २१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तिची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ९० इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डिन जोन्स यांनी स्वत:च्या मुलाला कधीच पाहिले नव्हते, कारणही आहे तसंच
दुबईत आज चेन्नई आणि दिल्लीत लढत, जाणून घ्या या सामन्याबद्दल सविस्तर माहिती
…म्हणून दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मयंक अगरवालने सुपर ओव्हरमध्ये केली नाही फलंदाजी
ट्रेंडिंग लेख –
पंजाबच्या ‘या’ ५ शिलेदारांनी गाजवला सामना, बेंगलोरला केले चीतपट
‘या’ पाच कारणांमुळे विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा पंजाबविरुद्ध झाला पराभव
आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक