इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत चेन्नईने चौथ्या वेळी आयपीएल ट्रॉफी उंचावली. त्याचबरोबर संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याच्या नावे एका नव्या आयपीएल विक्रमाची नोंद झाली.
फ्लेमिंगच्या नावे जमा झाला विक्रम
चेन्नईने अंतिम सामन्यात केकेआरवर मात करत चौथ्यांदा आयपीएल चषकावर आपला हक्क सांगितला. त्यांनी यापूर्वी २०१०, २०११ व २०१८ आयपीएलमध्ये विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या चारही वेळी संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हाच राहिला आहे. फ्लेमिंग याने आयपीएलमध्ये केवळ पहिल्या हंगामात खेळाडू म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर तो ११ हंगामात चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे.
फ्लेमिंग याने हे चौथे विजेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धनेला मागे सोडले. यापूर्वी हे दोघेही तीन-तीन विजेतेपदांसह संयुक्तरीत्या पहिल्या स्थानी होते. जयवर्धने याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने २०१७, २०१९ व २०२० आयपीएल आपल्या नावे केली होती.
चेन्नईने एकतर्फी केला केकेआरचा पराभव
या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने गोलंदाजीचा निर्णय घेत, सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावून १९२ धावा केल्या होत्या. सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ १६५ धावा केल्या. अशाप्रकारे त्यांना पराभव स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्या खरंच! आयपीएल विजेता धोनी पुन्हा बनणार ‘बापमाणूस’?, पत्नी साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा
त्रिपाठीची दुखापत ते चक्रवर्तीचे अपयश; या महत्त्वाच्या ५ कारणांमुळे केकेआरने गमावले आयपीएल विजेतेपद
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज, अव्वलस्थानी शार्दुलचा दबदबा