---Advertisement---

अकादमीमध्ये इंटरनेटचं स्पीड चांगल नसल्यामुळे या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा?

On: गुरूवार, जून 7, 2018 7:36 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच स्टीव्ह रिक्सन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी असलेल्या मतभेदांमुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पुढील आठवड्यात पाकिस्तान स्कॉटलंडविरूध्द २ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. स्टीव्ह रिक्सन ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आहेत.

इंग्लंडविरूध्दच्या लीडसवरील दुसऱ्या कसोटीच्या अगोदर रिक्सन पाकिस्तान संघाबरोबर सरावात सहभागी झाले नव्हते. ८००० अमेरिकन डॉलर एवढे मानधन त्यांना महिन्याला होते ते खात्यात जमा झाल्यानंतर रिक्सन संघाशी जोडले गेले. दोन वर्षांपुर्वी मिकी आर्थर यांना मुख्य प्रशिक्षक पदी संधी मिळाल्यानंतर सहयोगी स्टाफमध्ये रिक्सन यांना फिल्डिंग कोच म्हणून नेमण्यात आले होते.

जंग वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे रिक्सन यांच्या अनेक तक्रारी होत्या. लाहोरमध्ये राहण्यासाठी त्यांना नीट व्यवस्थित घर नव्हते, अकादमीमध्ये गेल्यावर इंटरनेटचा स्पीड खुपच कमी असे, महिन्याला मानधन वेळच्यावेळी मिळत नसे, अशा विविध तक्रारी होत्या.

लीडस कसोटीत जॉस बटलर चार धावांवर खेळत असताना हसन अलीने त्याचा सोप्पा झेल सोडला. रिक्सन त्यामुळे खुपच चिडले होते. पाकिस्तानला ही कसोटी एक डाव आणि ५५ धावांनी गमवावी लागली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment