---Advertisement---

WTC अंतिम सामना हरताच स्टीव्ह स्मिथच्या नावावर लाजिरवाणा विक्रम!

Usman-Khawaja-And-Steve-Smith
---Advertisement---

27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील संघाने 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याची सुरुवात जरी ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रणात होती, तरीही चौथ्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांनी जबरदस्त संयम आणि आत्मविश्वास दाखवत 282 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि क्रिकेट विश्वाला थक्क करून सोडले.

या अंतिम सामन्याने अनेक विक्रम घडवले, पण एक विक्रम मात्र स्टीव्ह स्मिथसाठी दु:खद ठरला. अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्मिथ आता आयसीसीच्या दोन मोठ्या अंतिम सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

1) 2010 टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना – इंग्लंडविरुद्ध झालेल्या या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभव स्वीकारावा लागला. तेव्हा स्मिथ संघाचा भाग होता.

2) 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल – तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्मिथला आयसीसी फायनलमध्ये सहभागी होता येणं भाग्य मिळालं, मात्र यावेळीदेखील त्याला निराशाच पदरात पडली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून इतिहास घडवला आणि स्मिथसाठी हा आणखी एक गमावलेला अंतिम सामना ठरला.

सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने संयमी खेळ करत 112 चेंडूत 66 धावा केल्या, पण दुसऱ्या डावात तो फॉर्म टिकवू शकला नाही. त्याने फक्त 25 चेंडूत 13 धावा करत झटपट माघारी परतला. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी त्याच्या बोटाला झालेली दुखापतही निर्णायक ठरली. त्याने टेम्बा बवुमाचा एक महत्त्वाचा झेल गमावला, आणि त्याच झेलमुळे आफ्रिकेचा कर्णधार विजयाचा शिल्पकार ठरला.

स्मिथने झेल सोडताना बोटाला इजा झाली, पण त्या एका क्षणाने सामन्याचे चित्रच बदलले. बवुमाने त्यानंतर संयमाने फलंदाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. स्मिथचा झेल चुकवणं आणि दुसऱ्या डावातील अपयश, या दोन्ही गोष्टी ऑस्ट्रेलियासाठी चांगल्या ठरल्या नाहीत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---