---Advertisement---

“भारतीय संघ परिपूर्ण”; ऑस्ट्रेलियन खेळाडूने गायले टीम इंडियाचे गुणगान

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 12:24 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामन्यांचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे सुपर -१२ फेरीतील सामने सुरू होण्यापूर्वी सर्व संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. दरम्यान बुधवारी (२० ऑक्टोबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाचे गुणगान गात मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघ परिपूर्ण

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना, २० षटक अखेर ५ बाद १५२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ९ गडी राखून विजय मिळवला.या सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “भारतीय संघ खूप चांगला आहे.त्यांचे सर्व बेस कव्हर झाले आहेत आणि त्यांच्याकडे सामना जिंकुन देणारे खेळाडू देखील आहेत. त्यांच्या संघातील सर्व खेळाडू इथेच आयपीएल स्पर्धा खेळले आहेत. ज्यामुळे त्यांना या परिस्थितीचा चांगलाच अनुभव आला आहे.”

तसेच स्टीव्ह स्मिथने आपल्या कामगिरीबद्दल बोलताना म्हटले की, “मला असे वाटत होते की, मी चेंडूला चांगल्याप्रकारे हिट करत होतो. मला आयपीएल स्पर्धेत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु, मी नेट्समध्ये भरपूर वेळ घालवला. मी माझ्या चुकांवर काम करत होतो. तसेच मी या परिस्थितीसोबत चांगलाच परिचीत आहे.” भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाची दोन्ही सराव सामन्यातील कामगिरी पाहिली तर, भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---