सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेचा (ashes series) थरार सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात २७५ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ऑस्ट्रेलिया संघाने २-० ची आघाडी घेतली आहे. सलग २ सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर जोरदार टीका होऊ लागली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने (Steve Smith) जो रुट याला(Joe Root) मोलाचा सल्ला दिला आहे.
दुसऱ्या कसोटीत प्रभारी कर्णधारपद सांभाळलेल्या स्टिव्ह स्मिथने जो रूटला मोलाचा सल्ला देत म्हटले की, “एक कर्णधार म्हणून तुमच्या कामगिरीवर टीका करण्यासाठी अनेक टीकाकार असतील. माझ्या मते मी जो रूटला एकच सल्ला देऊ शकतो. तो म्हणजे, त्याने स्वतःवर विश्वास ठेवावा. त्याने आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आणखी बळकट बनवण्यासाठी जी मदत होईल, ती करायला हवी.”(Steve Smith advice to joe root)
तसेच स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला की, “कधी कधी एक कर्णधार म्हणून खेळताना विरोधी संघाकडून तुम्ही बाद होता, त्यावेळी तुम्ही खूप काही करू शकत नाही. परंतु, आपण काय चांगलं करू शकतो हे प्रतिबिंबित करणं किंवा करू पाहणं नेहमीच महत्वाचं असतं. हा एक खेळाडू आणि नेता असण्याचा भाग आहे.”
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथला देण्यात आले होते. कारण ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला होता. ज्यामुळे त्याला सामन्याबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापकांनी पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ
भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’