जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच पहिला दिवस बुधरावारी (7 जून) पार पडला. उभय संघांतील हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांच्या योगदानामुळे संघ 300 धावांचा आकडा पार करू शकला.
भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र स्टीव स्मिथ () आणि ट्रेविस हेड यांना भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी पार केली आहे. स्मित 95*, तर हेड 146* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 3 विकेट्सच्या नुकसानावर 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी एकूण 85 षटकांचा खेळ होऊ शकला.
ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 2 असताना उस्मान ख्वाजा याची विकेट मोहम्मद सिराजला मिळाली. ख्वाजाने 10 चेंडूत शुन्य धावा करून चौथ्या षटकात यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका डावातील 22व्या षटकात बसला. सलामीवीर डेविड वॉर्नर यानेही यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात झेल गमावली. यावेळी संघाची धावसंख्या 71 होती आणि गोलंदाजी करत होता शार्दुल ठाकूर. मार्नस लाबुशेन याच्या रूपात ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली. संघाची धावसंख्या 76 असताना लाबुशेन मोहम्मद शमीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. वॉर्नर आणि लाबुशेनने अनुक्रमे 43 आणि 26 धावांचे योगदान दिले.
मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मात्र, उमेश यादव आणि रविंद्र जडेजा संघासाठी पहिल्या दिवशी अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. यादवने 14 षटकांमध्ये 54, तर जडेजाने 14 षटकांमध्ये 48 धावा खर्च केल्या. मात्र, या दोघांनाही दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट मिळाली नाही. जगातिक सर्वोत्तम कसोटी गोलंदाज अशी ओळख असणारा रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ओव्हलची ग्रीन टॉप खेळपट्टी पाहून भारतीय संघ व्यवस्थापनाने चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा हा डाव पहिल्या दिवशी त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे.(Steve Smith and Travis Head put on an incredible knock on Day 1 of the WTC Finals)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मंचावर स्मिथची बॅट पुन्हा तळवली, भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा हेडननंतर दुसरा ऑस्ट्रेलियन
ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी