दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकारण चांगलेच गाजले. या प्रकरणात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निलंबनाचीही कारवाई केली आहे.
या निलंबनाच्या निर्णयानंतर स्टीव्ह स्मिथने माध्यमांसमोर येऊन चाहत्यांची आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माफी मागितली. यावेळी त्याला त्याचे अश्रूही अनावर झाले होते. पण त्याच्या वडिलांनी त्याला धीर देऊन सांभाळले.
या घटनेनेनंतर अनेकांनी स्मिथबद्दल सहानुभूती व्यक्त केली. स्मिथचे जगभरात अनेक चाहते आहेत त्यामुळे त्यांनी स्मिथवर आलेल्या एक वर्षांच्या बंदीनंतर हळहळ व्यक्त केली होती.
यात चॅनेल नाईनची सदारकर्ती डेबोराह नाईट यांचा मुलागा डोर्सीही स्टीव्ह स्मिथला रडताना बघून दुखी झाला होता, याबद्दल त्यांनी ट्विटकरून सांगितले. त्यानंतर स्मिथनेही नाईट यांना संदेश पाठवून या चिमुकल्याची माफी मागितली.
नाईट यांनी ट्विट केले होते की, “स्मिथची पत्रकार परिषद संपल्यानंतर मला माझ्या ९ वर्षाच्या रडणाऱ्या मुलाला समजावयाला २० मिनिटे लागली, व तो स्मिथचा खूप मोठा चाहता आहे. त्याला आणि बाकी मुलांना स्मिथवर तुम्ही किती प्रेम करता याबद्दल एक पत्र लिहायला सांगितले.”
https://twitter.com/deborah_knight/status/979286681663647744
हे ट्विट स्मिथने पाहिल्यानंतर त्याने थेट संदेश पाठवला की “तुम्ही माझ्यासाठी तुमच्या मुलाची माफी मागू शकता का. मला माफ करा मी त्याला खूप नाराज केले.”
याला उत्तर म्हणून नाईट यांनी त्याला लिहिले की, ” संपर्क साधल्याबद्दल स्मिथ तुझे आभार. तू या सगळ्यात ज्याप्रकारे स्वतःला सांभाळले ते पाहून माझ्या मुलाला तू पूर्वीपेक्षाही जास्त आवडायला लागला आहे. आम्हाला माहित आहे तू या सगळ्यातून बाहेर येशील. लवकर बरा हो आणि कुटुंबासोबत वेळ घालावं.”
यावर स्मिथने म्हटले, “त्याचा पाठिंबा मिळाल्याने आनंद झाला. खूप धन्यवाद”
https://twitter.com/deborah_knight/status/979581730377031680
स्मिथ आणि वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १ वर्षांची तर बॅनक्रोफ्टला ९ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवरही ७ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आयपीएल मोसमासाठीही बीसीसीआयनेही बंदी घातली आहे.