गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यातील अंतर्गत वादांच्या बातम्या बाहेर येत आहेत. लँगर यांच्या कार्यशैलीबाबत आणि अति शिस्तप्रियतेबद्दल खेळाडू नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. तसेच ‘जस्टिन लँगर हे ड्रेसिंग रूम मध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत’, असे म्हणत त्यांचे समर्थन देखील केले आहे.
स्टीव स्मिथने केले जस्टिन लँगर यांचे समर्थन
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला परजयाचा सामना करावा लागला होता. यांनतर सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्रात नमूद करण्यात आले होते की, संघातील वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या कार्य क्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सहायक प्रशिक्षक एंड्रयू मैकडॉनल्ड यांचे कौतुक करण्यात आले आहे.
स्मिथ याने जस्टिन लँगर यांच्याबद्दल बोलतांना म्हंटले की, “माझ्या मते लँगर यांनी गेल्या काही वर्षात उत्कृष्ट कार्य केले आहे. ते नेहमी आणखीन चांगले होण्याचा प्रयत्न करत असतात. आपण कोणाकडून यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकतो. भले तो प्रशिक्षक असो अथवा खेळाडू. जर तुम्ही दिवसेंदिवस उत्कृष्ट होत असाल तर, अजून काय पाहिजे आहे.”
वेगळ्या फॉरमॅट मध्ये वेगळा प्रशिक्षक?
वेगळ्या फॉरमॅट साठी वेगळा प्रशिक्षक निवडण्याच्या बाबतीत स्टीव स्मिथ याने म्हंटले, “वेगळ्या फॉरमॅट साठी वेगळा संघ आणि वेगळा प्रशिक्षक या गोष्टींच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. होऊ शकेलहे असे इतर संघात परंतु ऑस्ट्रेलिया मध्ये असे होणार नाही. मला असे वाटते की, जस्टिन चांगले कार्य करत आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून करत आले आहेत.”
“फलंदाजी मध्ये केला बदल”
भारतीय संघाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये स्टीव स्मिथने सिडनी कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. याव्यतिरिक्त त्याने कुठलीही मोठी खेळी केली नाही. यावर तो म्हणाला, “विपक्षी संघांनी माझ्यावर आक्रमण करण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्यामुळेच मला कधी कधी आक्रमक खेळावे लागत आहे. तसेच धावा करण्यासाठी वेगळी रणनीती ही बनवावी लागते आहे”.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी
अरेरे! चेतेश्वर पुजारा झाला दुर्दैवी पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ
अबुधाबी टी१० लीग : दिल्ली बुल्सवर मात करत नॉदर्न वॉरियर्सने पटकावले विजेतेपद




