ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी तयार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्मिथ इंग्लंडमध्ये तयारी करू इच्छित आहे आणि त्याने ससेक्ससोबत काही सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी स्मिथला भारतीय दिग्गज चेतेश्वर पुजारा याच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पहिल्यांदाच ससेक्स संघाचा नियमित कर्णधार बनला. चाले चालू काउंटी हंगामात संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आहे, ज्यामुळे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आले. आता ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) ससेक्स संघासाठी पुजाराच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. जून महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. अर्थात पुजारा आणि स्मिथ देखील या सामन्यात एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. मात्र, त्याआधी मे महिन्यात हे दोन्ही दिग्गज ससेक्सकडून एकत्र खेळताना दिसतील.
स्मिथ देखील पुजाराच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्सुक दिसत आहे. स्मिथच्या मते आयपीएलच्या माध्यमातून विरोधी संघांच्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांसमोबत खेळण्याची संधी खेळाडूंना आधीच मिळाली आहे. मात्र, पुजारासोबत काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी तो अधिक उत्सुक आहे. ससेक्सच्या वेबसाईटवर स्मिथ म्हणाला, “ज्या दिवशी क्रिकेटमद्ये नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा संपेल, त्यादिवशी शक्यतो मी क्रिकेट खेळणं बंद करेल. मी पुजारासोबत खेळण्यासाठीही उत्सुक आहे. त्याच्या विरोधात मी खूप खेळलो आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूप धावा करतानाही पाहिले आहे. आशा आहे की खेळपट्टीवर आम्ही एकमेकांसमोबत वेळ घालवू आणि एकमेकांविषयी अधिक जाणून घेऊ.”
दरम्यान, आयपीएल 2023 होण्यापूर्वीच स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळला होता. चालू आयपीएल हंगाम संपल्यानंतर 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना (WTC Final) खेळला जाईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडमध्ये 16 जूनपासून पाच कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका खेळायची आहे. (Steve Smith eager to play under Pujara before WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही ठरवलं आहे मी नाही?’, धोनीने घेतली समालोचकाची फिरकी
दिल्लीविरुद्ध केलेल्या घातक वेगवान गोलंदाजीबाबत शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी माझ्या…’