---Advertisement---

सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथची जबरा फलंदाजी, शतकासह केली कोहलीची बरोबरी

On: शुक्रवार, जानेवारी 8, 2021 10:31 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना चालू आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात भारतीय गोलंदाजांची पुरती दैना उडवत दमदार पुनरागमन केले आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यात स्मिथला साधे अर्धशतकही करता आले नव्हते. मात्र या सामन्यात त्याने झुंजार शतकी खेळी करत संघाचा डाव ३३८ धावांपर्यंत पोहोचवला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत स्मिथने २२६ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या. यात त्याच्या १६ चौकारांचा समावेश होता. हे स्मिथचे भारताविरुद्ध कसोटीत केलेले आठवे शतक होते; तर आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील तब्बल २७ वे शतक होते. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले आहे.

स्मिथबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या विक्रमाच्या यादीत संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर आणि केन विलियम्सन यांनी कसोटीत प्रत्येकी २४ शतके केली आहेत.

भलेही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय फलंदाजांच्या यादीत स्मिथ विराटसह पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र स्मिथने विराटपेक्षा कमी डावात कसोटीत २७ शतके केली आहेत. त्याने अवघ्या १३६ डावात हा पराक्रम केला आहे. तर विराटला कसोटीतील २७ शतके करण्यासाठी जवळपास १४१ डावांची गरज लागली होती. विराटने २०१९ मध्ये बांग्लादेशविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील २७वे शतक ठोकले होते.

कसोटीत सर्वाधिक शतकं करणारे सक्रिय खेळाडू –
२७ – स्टिव्ह स्मिथ
२७ – विराट कोहली
२४ – डेविड वॉर्नर
२४ – केन विलियम्सन

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात; स्मिथचे शानदार शतक

भारताविरुद्ध स्मिथची आठवी कसोटी सेंचूरी, ‘इतक्या’ डावात केलाय हा पराक्रम

भारताविरुद्ध स्मिथचा बोलबाला! गेल्या ५ वर्षात केलीत ४ शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---