सिडनी। गुरुवारपासून (७ जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९८ व्या षटकात २०१ चेंडूत १३ चौकारांसह त्याचे कारकिर्दीतील २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षातील भारताविरुद्ध हे त्याचे चौथे कसोटी शतक आहे. मागील ५ वर्षात ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध ५ कसोटी शतके झळकावण्यात आली आहेत. त्यातील ४ शतके स्मिथनेच केली आहेत. त्यातील ३ शतके त्याने २०१७ च्या भारत दौऱ्यात केली आहेत. तसेच १ शतक ग्लेन मॅक्सेवलने केले आहे.
या मैदानांवर स्मिथने मागील ५ वर्षात भारताविरुद्ध केली आहेत कसोटी शतके –
स्मिथने गेल्या पाच वर्षात भारताविरुद्ध पुणे, रांची, धरमशाला आणि सिडनी या ठिकाणी शतके केली आहेत. त्याने २०१७ ला भारतातील पुणे, रांची आणि धरमशालाच्या मैदानांवर शतके केली होती. त्याने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १०९ धावांची, रांचीतील स्टेडियमवर नाबाद १७८ धावांची आणि धरमशाला येथील मैदानावर १११ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने सिडनी येथे देखील शतकी खेळी केली आहे.
मागील ९ शतकांपैकी ७ शतके स्मिथची
ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध करण्यात आलेल्या मागील ९ शतकांपैकी तब्बल ७ शतके स्टिव्ह स्मिथने केली आहे. अन्य २ शतकांपैकी ग्लेन मॅक्सवेल आणि डेविड वॉर्नर यांनी प्रत्येकी १ शतक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना भावा! हवेत उंच उडी घेत ‘त्याने’ एका हाताने अडवला सिक्सर, व्हिडिओ तूफान व्हायरल
बुमराहने स्मिथची केलेली नक्कल पाहून सिराजला आवरले नाही हसू, पाहा व्हिडिओ
‘या’ कारणांमुळे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने गाजवले वर्चस्व