---Advertisement---

Video: स्मिथमध्ये पुन्हा दिसली ‘वॉर्न’ची झलक, इंग्लंडच्या लीचला असं पकडलं फिरकीच्या जाळ्यात

On: रविवार, जानेवारी 9, 2022 6:06 PM
Steve-Smith
---Advertisement---

सिडनी। ऍशेस २०२१-२२ कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंडला यश आले. शेवटच्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील शेवटची विकेट घेण्यात अपयश आल्याने थरारक सामना अखेर अनिर्णित निकालावर संपला. पण, या सामन्यात चर्चेचा विषय राहिली ती ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याची गोलंदाजी. 

झाले असे की, अखेरच्या दिवशी (९ जानेवारी) ऑस्ट्रेलियाला शेवटची काही षटके बाकी असताना सामना जिंकण्यासाठी केवळ २ विकेट्सची गरज होती. मात्र जॅक लीच आणि स्टुअर्ट ब्रॉडने ८ व्या विकेटसाठी ५२ चेंडूंचा सामना करताना ३३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीने सामन्यात रंगत भरली होती. असे असतानाच अंधार पडू लागल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला वेगवान गोलंदाजांचा मारा थांबवावा लागला आणि फिरकी गोलंदाज आक्रमणासाठी आणावे लागले.

त्याचमुळे त्याने स्टीव्ह स्मिथच्या हाती चेंडू सोपवला. स्मिथनेही कर्णधाराला नाराज न करता १०० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जॅक लीचला २६ धावांवर बाद केले. स्मिथने लीचला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडत बाद केले. स्मिथने लीचला ऑफ कटर चेंडू टाकला होता. ज्यावर बचावात्मक फटका खेळण्याच्या नादात लीच डेव्हिड वॉर्नरकडे झेल देत विकेट गमावून बसला. स्मिथला कसोटीत २०१६ नंतर पहिल्यांदाच विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता स्मिथच्या खात्यात १८ कसोटी विकेट्स झाल्या आहेत.

यानंतर असं वाटत होतं की, अखेरची विकेट घेत ऑस्ट्रेलिया सामना जिंकेल. मात्र स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनने अखेरची दोन्ही षटके खेळून काढली आणि सामना अनिर्णित राखला. विशेष म्हणजे अखेरच्या षटकात  स्मिथच्या फिरकी गोलंदाजीचा अँडरसनने धीराने सामना केला आणि इंग्लंडला पराभवापासून वाचवले.

स्मिथ आणि फिरकी गोलंदाजीचे खास नाते
स्टीव्ह स्मिथ आजच्या घडीला जरी दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एक फिरकीपटू म्हणून झाली होती. शेन वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाला फिरकी गोलंदाजाची कमतरता जाणवू लागली होती. अशावेळी स्मिथकडे वॉर्नचा वारसदार म्हणून पाहिले जात होते. स्मिथही फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना तळातल्या फळीत फलंदाजी करायचा. मात्र पुढे जाऊन स्मिथने त्याच्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत केले आणि आज तो सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

PHOTOS: टेन्शन म्हणजे काय असते? स्टोक्सला विचारा? पाहा व्हायरल फोटो

…आणि पर्यावरण मंत्र्यातील खेळाडू खूश झाला; थरारक सिडनी कसोटीनंतर आदित्य ठाकरेंचे खास ट्विट

Ashes: ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत इंग्लंडने अनिर्णित राखली ‘थरारक’ सिडनी कसोटी

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---