---Advertisement---

कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथचा खास सल्ला, पहा व्हिडिओ

On: बुधवार, एप्रिल 3, 2019 3:16 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथने एक खास सल्ला दिला आहे. याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर शेअर केला आहे.

फिरकीपटू म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मिथने रहाणेला म्हटले आहे की “Give Boom Boom a bowl”(मला बुम बुम बॉल दे). याबद्दलचे स्पष्टीकरण देताना स्मिथने सांगितले की तो शाहिद आफ्रिदीचा नक्कल करु शकतो. त्यामुळे रहाणेने त्याला गोलंदाजी द्यावी. आफ्रिदी ‘बुमबमु आफ्रिदी’ या नावाने लोकप्रिय आहे.

स्मिथने म्हटले आहे की ‘मी माझ्या गोलंदाजीत काही बदल केला आहे. मी शाहिद आफ्रिदीच्या शैलीप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. तो चांगला लेग स्पिनर आहे. माझ्या वाढत्या वयानुसार मला माझ्या नेहमीच्या गोलंदाजी शैलीत गती मिळत नाही. आशा आहे की मला खूप गोलंदाजी करावी लागणार नाही.’

https://twitter.com/rajasthanroyals/status/1113008052318466048

स्मिथने मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना 31 चेंडूत 38 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारत राजस्थानच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 158 धावा केल्या होत्या आणि राजस्थान रॉयल्स समोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने 19.5 षटकात सहज पार केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

–आयपीएल २०१९: चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…

–आयपीएल २०१९: बेटिंगप्रकरणी भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठेला अटक

–विश्वचषक २०१९ साठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड ठरला पहिला देश!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment