---Advertisement---

SL vs AUS; स्टीव्ह स्मिथचा भीमपराक्रम, खाते उघडताच रचला इतिहास, सचिन-द्रविडला टाकलं मागे

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका आज 29 जानेवारीपासून गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डावाची सुरुवात शानदार पद्धतीने केली आणि केवळ 14 षटकांत 91 धावा स्कोअरबोर्डवर जमा केल्या. मात्र पुढच्या षटकात अर्धशतक झळकावून ट्रॅव्हिस हेड बाद झाला. 29 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला मार्नस लाबुशेनच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला. 20 धावा काढून लाबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ नवीन फलंदाज म्हणून मैदानात आला आणि त्याने खाते उघडताच एक मोठा विक्रम रचला.

प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. कसोटीत 10,000 धावा करणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकूण 15 वा फलंदाज ठरला आहे. 115 व्या कसोटी सामन्याच्या 205 व्या डावात स्मिथने ही मोठी कामगिरी केली. यासह, स्मिथने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांचे मोठे विक्रम मोडले. स्मिथने 115 कसोटी सामन्यांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या, तर सचिन तेंडुलकरने 122 कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा (सामना)

ब्रायन लारा – 111 सामने
कुमार संगकारा – 115 सामने
स्टीव्ह स्मिथ – 115 सामने
युनूस खान – 116 सामने
रिकी पॉन्टिंग – 118 सामने
जो रूट – 118 सामने
राहुल द्रविड – 120 सामने
सचिन तेंडुलकर – 122 सामने

जर आपण कसोटी डावांबद्दल बोलायचे झाले तर, स्मिथने राहुल द्रविडपेक्षा कमी डावांमध्ये 10 हजार क्लबमध्ये स्थान मिळवले. द्रविडने 206 डावांमध्ये हा विक्रम केला तर स्मिथने 205 डावांमध्ये 10 हजार धावांचा आकडा गाठला. सर्वात कमी डावांमध्ये 10 हजार कसोटी धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने 195 डावांमध्ये 10,000 धावा केल्या.

कसोटीत 10,000 धावा करणारे फलंदाज

सुनील गावस्कर
अ‍ॅलन बॉर्डर
स्टीव्ह वॉ
ब्रायन लारा
सचिन तेंडुलकर
राहुल द्रविड
रिकी पॉन्टिंग
जॅक कॅलिस
महेला जयवर्धने
शिवनारायण चंद्रपॉल
कुमार संगकारा
अ‍ॅलिस्टर कुक
युनूस खान
जो रूट
स्टीव्ह स्मिथ

हेही वाचा-

वरुण चक्रवर्तीने अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
14 महिन्यांनी मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, अशी होती कामगिरी
IND vs ENG: राजकोटमध्ये टीम इंडियाचा पराभव, कर्णधार सूर्या म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---