---Advertisement---

कसोटी इतिहासात कोणालाही जे जमले नाही ते स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!

---Advertisement---

लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा केल्या. त्यांच्याकडून या डावात स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 145 चेंडूत 80 धावांची खेळी केली.

स्मिथची इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही सलग 10 वी वेळ आहे. त्याने 2017-2019 या कालावधीत इंग्लंडविरुद्ध सलग 10 कसोटी डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

त्यामुळे तो एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सलग 10 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा कसोटी क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

हा पराक्रम करताना त्याने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक यांचा विक्रम मागे टाकला आहे. इंझमाम यांनी 2001-2006 या कालावधील इंग्लंड विरुद्धच सलग 9 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी केल्या होत्या.

स्मिथने इंग्लंडविरुद्ध मागील 10 कसोटी डावात अनुक्रमे 239, 76, 102*, 83, 144, 142, 92, 211, 82, 80 अशा मिळून 1251 धावा केल्या आहेत.

सध्या द ओव्हलवर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर(13 सप्टेंबर) इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 9 धावा केल्या असून जो डेन्ली (1) आणि रॉरी बर्न्स(4) नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 225 धावांवर बाद झाल्याने इंग्लंडने 69 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड सध्या दुसऱ्या दिवसाखेर 78 धावांनी आघाडीवर आहेत.

कसोटीत एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वाधिकवेळा सलग 50+ धावांची खेळी करणारे फलंदाज –

10 – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2017-2019)*

9 – इंझमाम-उल-हक (पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2001-2006)

8 – क्लाईव्ह लॉइड (वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड, 1980-1984)

8 – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, 2007-2010)

8 कुमार संगकारा (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, 2009-2014)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

८० धावांची खेळी करत स्मिथने केली ६४ वर्षांपूर्वीच्या या विश्वविक्रमाची बरोबरी

कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा वॉर्नर पहिलाच सलामीवीर फलंदाज

व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू म्हणतो, ‘अनेक ऑस्ट्रेलियन्स माझा तिरस्कार करतात’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment