भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने हा अखेरचा सामना जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
उभय संघातील पहिला सामना भारतीय संघाने नागपूर येथे एकतर्फी आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पिछाडीवरून पुनरागमन करत विजय संपादन केला. तर, ऑस्ट्रेलियाने इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात पलटवार करत विजय मिळवला. त्यानंतर आता अखेरचा सामना जिंकण्याचा देखील मनोदय स्मिथ याने बोलून दाखवला.
अहमदाबाद कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला,
“मला वाटते की हा केवळ यात संघासाठी नव्हे तर कोणत्याही संघासाठी सर्वोच्च क्षण असेल की, तुम्ही भारतात येऊन दोन कसोटी सामने जिंकता. दुर्भाग्यरित्या, यापूर्वी आम्ही असे करू शकलो नाही. मात्र, आता इथे येऊन मालिका बरोबरीत सोडवणे एक सकारात्मक गोष्ट असेल.”
ऑस्ट्रेलियन संघ भारतात 2006 नंतर कसोटी मालिका जिंकू शकला नाही. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाकडून तशा अपेक्षा होत्या. मात्र, संघाने मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्याने त्यांची ही संधी हुकली. नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतल्यानंतर स्मिथकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्याने आपल्या नेतृत्वाची झलक दाखवत ऑस्ट्रेलियाला विजयी केले. त्याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2017 दौऱ्यात पुणे कसोटी जिंकण्याचा कारनामा केला होता. भारतात दोन कसोटी सामने जिंकणारा तो केवळ पाचवा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे.
अहमदाबाद कसोटीसाठी संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ-
उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हॅंड्सकॉम्ब, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हमन व नॅथन लायन.
(Steve Smith Hoping Australia Won Ahmedabad Test And Draw Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार