ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ अलिकडच्या काही दिवसांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी (29 जून) स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक ठोकले. इंग्लंडविरुद्धचा दुसरा ऍशेस सामना सध्या लॉर्ड्सवर खेळला जात आहे. गुरुवारी शतक ठोकताच स्मिथच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली.
पहिल्या दिवसी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 339 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी स्टीव स्मिथ (85*) आणि ऍलेक्स केरी (11*) यांनी ऑस्ट्रेलियासाठी दिवसाची सुरुवात केली. स्टीव स्मिथ (Steve Smith) याने दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. पण केरी अवघ्या 22 धावांवर विकेट्स केल्या. ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने 184 चेंडूत 110 धावा करून विकेट गमावली. नवघ्या जोश टंग (Josh Tongue) याने त्याला बेन डकेतच्या हाताच झेलबाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथचे हे 32वे, तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील 44 वे शतक ठरले.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असणाऱ्यांमध्ये स्टीव स्मिथ चौथा क्रमांकावर पोहोचला आहे, ज्याने सर्वाधिक शतके केली आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर 75 शतकांसह विराट कोहली आहे. जो रुट (46) आणि डेविड वॉर्नर (45) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांवर आहेत. स्मिथ चौथ्या क्रमांकवर आला आहे. त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा (43) याला मागे टाकत हा विक्रम केला आहे.
स्टीव स्मिथ (), जो रुट (Joe Root), केन विलियम्सन (Kane Williamson) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. ‘फॅब फोर’ अशी त्यांची ओळख आहे. पण आकडेवारी पाहता या चौघांमध्ये स्मिथच सध्या पहिल्या क्रमांकवर आहे. स्मिथच्या नावावर 32 कसोटी शतकांची नोंद असून 30 शतकांसह जो रुट दुसऱ्या क्रमांकवर आहे. यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे केन विलियम्सन आणि विराट कोहली यांची नावे आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 28-28 कसोटी शतके केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये फॅब फोरची आकडेवारी
1. स्टीव स्मिथ – 32 शतके
2. जो रुट – 30 शतके
3. केन विलियम्सन – 28 शतके
4. विराट कोहली – 28 शतके
तत्पूर्वी, ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात एजबस्टनवर स्टीव स्मिथला ट्रोल करण्यासाठी प्रेक्षकांनी घोषणाबाजी केली होती. 2018 साली चेंडूशी छेडछाड प्रकरणात स्मिथला दोषी ठरवले गेले होते. प्रेक्षकांनीही एजबस्टन कसोटीत स्मिथ क्षेत्ररक्षण करत असताना त्याला या प्रकरणाची आठवण करू दिली होती. मात्र, लॉर्ड्सवर स्मिथने याच प्रेक्षकांना आपल्या बॅटने प्रत्युत्तर दिले, असे म्हणता येईल.(Steve Smith Hundred in the Ashes 2023 at Lord’s.)
महत्वाच्या बातम्या –
स्मिथचा नाद पराक्रम! गोलंदाज म्हणून सुरुवात केली, पण बघता बघता पूर्ण झाल्या 15000 आंतरराष्ट्रीय धावा
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?