लाहोर। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गद्दाफी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सोमवारी (२१ मार्च) सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याच्या खेळीदरम्यान त्याच्या एका कृतीची बरीच चर्चा झाली.
झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (७) आणि मार्नस लॅब्युशेन (०) यांची विकेट स्वस्तात गमावली. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याचवेळी हसन अली गोलंदाजी करत असलेल्या ११ व्या षटकादरम्यान स्मिथचे लक्ष बाऊंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या कॅमेरामुळे विचलित झाले.
बाऊंड्री लाईनबाहेर सातत्याने कॅमेरा हलत असल्याने (movement of buggy cam) लक्ष विचलित होत असल्याची तक्रारही त्याने पंचांकडे केली, तसेच त्याने ख्वाजाशीही चर्चा केली. तो यामुळे बराच नाराज दिसला. या घटनेचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बग्गी (कॅमेरा) स्मिथची माफी मागतोय.’
https://twitter.com/TheRealPCB/status/1505796193770692613
खरंतर असे अनेकदा होते की, मैदानावरील कॅमेरांमुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होते. याबद्दल खेळाडू नाराजीही व्यक्त करताना दिसतात. यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात ऍशेस मालिकेतील होबार्ट कसोटीदरम्यान ब्रॉडनेही स्मिथप्रमाणेच कॅमेराबद्दल तक्रार केली होती.
https://twitter.com/cricketcomau/status/1482198017679638528
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवशी २३० हून अधिक धावा
पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून (Pakistan vs Australia) वॉर्नर आणि लॅब्यूशेन बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजाने डाव सांभाळला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारीही केली. स्मिथ ५९ धावांवर आणि ख्वाजा ९१ धावांवर बाद झाला.
त्याशिवाय ट्रेविस हेडने २६ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर ५ बाद २३२ धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर कॅमेरॉन ग्रीन २० धावांवर आणि ऍलेक्स कॅरे ८ धावांवर नाबाद आहेत. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर साजिद खानने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव्ह स्मिथचा सचिन-संगकाराच्या विश्वविक्रमांना ‘दे धक्का’! १५० कसोटी डावांत मोठे पराक्रम नावावर
बॉक्स क्रिकेट ते फुल व्हॉलीबॉल; ‘एमआय अरेना’मध्ये पलटणची धमाल मस्ती, व्हिडिओ बनवेल तुमचा दिवस
INDW vs BANW | ‘करा अथवा मरा’ लढतीसाठी उतरणार टीम इंडिया, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही






