ऑस्ट्रेलियाचा ३१ वर्षीय फलंदाज स्टिव्ह स्मिथने मायदेशातील प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जैव सुरक्षित वातावारणातून मुक्त होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले.
स्मिथ संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आयपीएल २०२०च्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे तो सध्या जैव सुरक्षित वातावरणात आहे. यापुर्वीही ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दौऱ्यावेळी त्याने जैव सुरक्षित वातावरणात वेळ घालवला आहे.
याविषयी बोलताना स्मिथ म्हणाला की, “मी कुणाला बळजबरी करत नाही. पण डेविड वॉर्नर आणि पॅट कमिन्सदेखील बिग बॅश लीगमधून माघार घेऊ शकतात. मी सध्या युएईत जैव सुरक्षित वातावरणाचे विपरित परिणाम पाहून हा निर्णय घेतला आहे. तसेच मी बऱ्याच महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला भेटलेलो नाही. खरे तर, आता कुठे जैव सुरक्षित वातावरणात राहण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे माहिती नाही पुढे अजून किती दिवस असे राहावे लागेल.”
जर एखाद्या खेळाडूने जैव सुरक्षित वातावरणाला कंटाळुन कोणत्या स्पर्धेतून सुट्टी घेतली आणि त्याच्या जागी खेळलेल्या खेळाडूने चांगली कामगिरी केली. तर त्या खेळाडूला पुन्हा संघातील त्याचे स्थान परत मिळेल का? यावर उत्तर देत स्मिथ म्हणाला की, “जैव सुरक्षित वातावरणात राहिल्यानंतर तुम्हाला मानिसक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतर साधारण वातावरणात काही वेळ घालवणे आवश्यक असते.”
महत्त्वाच्या बातम्या-
युनिव्हर्स बॉसचा रुद्रावतार! ९९ धावांवर बाद झाल्यानंतर गेलने पुढे काय केले पाहाच
अबब!! ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा ‘भीमपराक्रम’, टी२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूबद्दल सचिनने केलेली भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाला होता…
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान