---Advertisement---

अबब!! ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा ‘भीमपराक्रम’, टी२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

On: शुक्रवार, ऑक्टोबर 30, 2020 11:03 PM
---Advertisement---

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएलच्या १३व्या हंगामातील ५०वा सामना झाला. राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेल्या या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

झाले असे की, नाणेफेक जिंकत राजस्थानने गोलंदाजी निवडली आणि पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर पंजाबने कमालीची फलंदाजी करत मर्यादित २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गेलने १५७.१४च्या स्ट्राईक रेटने ९९ धावांची अफलातून खेळी केली. यात त्याच्या ६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.

या ८ षटकारांसह गेलने त्याचे ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील १००० षटकार पूर्ण केले आहेत. यासह हा सिक्सर किंग ट्वेंटी ट्वेंटीत एक हजार षटकार ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर कायरन पोलार्ड ६९० षटकारांसह या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहे, तर ब्रेंडन मॅक्यूलम (४८५ षटकार) आणि शेन वॉटसन (४६७ षटकार) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

गेलच्या ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ४०९सामने खेळले असून १३४७३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या आयपीएलमधील १३० सामन्यांतील ४६६१ धावांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट

-VIDEO : जेव्हा धोनीतला मस्ती मॅन जागा होतो… पाहा ख्रिस गेलची नक्कल करणाऱ्या धोनीचा खास व्हिडिओ

-रन आऊट तर तुम्ही खूप पाहिले असतील! पण पाकिस्तानी खेळाडूंच्या ‘या’ कारनाम्याला तोड नाही

ट्रेंडिंग लेख-

CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम

अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला

IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---