ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याला सध्याच्या ‘फॅब फोर’ फलंदाजांमध्येही गणले जाते. तरीही, असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांच्याविरुद्ध स्मिथला धावा करणे कठीण वाटते. त्याने सध्याच्या काळातील चार सर्वोत्तम गोलंदाजांचा खुलासा केला आहे. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त त्याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनलाही ठेवले आहे.
स्मिथने कसोटी क्रिकेटमधील सध्याच्या काळातील सर्वात्तम फलंदाज मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणाऱ्या या फलंदाजाविरुद्ध कोणालाही गोलंदाजी करणे आव्हान आहे. असे असले तरी स्मिथने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. असे असतानाही असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांच्याविरुद्ध स्मिथला धावा करणे कठीण वाटते. प्रश्नोत्तर सत्रात त्यानी हा खुलासा केला आहे.
सध्याच्या युगातील सर्वात प्रभावी गोलंदाजांची नावे देण्यासाठी स्मिथला हा प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरात त्याने ४ प्रभावी गोलंदाजांचा उल्लेख केला. यामध्ये भारताचा जसप्रीत बुमराह, इंग्लंडचा जेम्स अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. स्मिथ म्हणाला की, सध्या हे चार गोलंदाज जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहेत. विशेष म्हणजे स्मिथने नामांकित केलेले चौघेही वेगवान गोलंदाज आहेत.
अँडरसनने नॉटिंगहॅम कसोटीत अनिल कुंबळेचा विक्रम मोडला
इंग्लंडचा जेम्स अँडरसन या ४ गोलंदाजांपैकी सर्वात अनुभवी आहे. अँडरसन ३९ वर्षांचा आहे. त्याने नुकतेच नॉटिंघममध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ४ विकेट घेण्यात तो यशस्वी झाला. यादरम्यान त्याने माजी भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेचा ६१९ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडला. आता अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू बनला आहे.
त्याचबरोबर बुमराहनेही या कसोटीत घातक गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून एकूण ९ विकेट्स घेतल्या.
स्मिथची कोपरच्या दुखापतीशी झुंज
दरम्यान, ३१ वर्षीय स्मिथ कोपरच्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात तो शेवटचा दिसला होता. जिथे त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ६ सामने खेळले. स्पर्धेदरम्यानच त्याची दुखापत अधिक त्रास देऊ लागली. नंतर त्याला यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. या कारणास्तव तो वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकला नाही. टी -२० विश्वचषकाला फक्त काही महिने शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना आशा आहे की, स्मिथ स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
जुलै २०२१ ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
गेल्या २ वर्षांत भारतासाठी इंग्लंडमधील पाऊस ठरतोय त्रासदायक; गमावलेत ‘हे’ २ महत्त्वाचे सामने
‘पाऊस बनला खलनायक’, इंग्लंड-भारत कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर चाहते संतापले; दिल्या अशा प्रतिक्रिया