इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2020 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे या संघाचा कर्णधार होता. पण स्पर्धेच्या अर्ध्यातच संघाच्या अपयशामुळे स्मिथला कर्णधारपद देण्यात आले होते.
स्मिथने मागील मोसमात कर्णधारपद स्विकारल्यानंतर राजस्थानला सलग चार सामन्यात विजय मिळवून दिले होते.
राजस्थान रॉयल्स संघाने 2020 च्या आयपीएल मोसमासाठीही स्मिथलाच कर्णधार म्हणून कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक ऍडयू मॅकडोनाल्ड यांनी स्मिथच्या कर्णधारपदाची पुष्टी केली आहे.
Aye aye, Captain! 👋🏾💗#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/xvDGTVBc1t
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 15, 2019
राजस्थान संघाने अॅश्टन टर्नर, ओशाण थॉमस, शुभम रांजणे, प्रशांत चोप्रा, ईश सोधी, आर्यमान बिर्ला, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी या खेळाडूना 2020च्या आयपीएल लिलावाआधी संघातून मुक्त केले आहे.
तसेच स्मिथ, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रायन पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरूर, वरुण ऍरॉन आणि मनन वोहरा या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी, गांगुलीने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/iBRVGpTxWP👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
कोहलीच्या टीम इंडियाचे त्रिशतक पूर्ण, बाकी संघांचे गुण नक्की पहा…https://t.co/yD2mdKw7rp#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia
— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019