मँचेस्टर। रविवारी(८ सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध चौथ्या ऍशेस कसोटीत 185 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलिया या मालिकेत पराभूत होणार नाही हे पक्के झाले असल्याने ऍशेस ट्रॉफी आपल्याकडेच राखण्यात ऑस्ट्रेलियाने यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे 18 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये ऍशेस मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणार नाही. याआधी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये 4-1 ने ऍशेस मालिका जिंकली होती. पण त्यानंतर 2005, 2009, 2013 आणि 2015 मध्ये इंग्लंडला झालेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला होता.
2005 ला 1-2 तर 2009 लाही 1-2 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेल्या ऍशेस मालिकेत पराभव स्विकारला होता. तसेच मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली 2013 ला 0-3 आणि 2015 ला 2-3 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका गमावली होती.
त्यानंतर आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत टिम पेनच्या नेतृत्वाखाली सध्या ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांनंतर 2-1 अशी आघाडीवर आहे.
पेन हा स्टिव वॉनंतर इंग्लंडमध्ये ऍशेस मालिकेत पराभूत न होणारा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. तसेच पेनला कर्णधार म्हणून यावेळी ऍशेस मालिका जिंकण्याचीही सुवर्णसंधी आहे. पेन हा पहिल्यांदाच ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे.
या ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 12 सप्टेंबरपासून लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणार आहे.
चौथ्या ऍशेस कसोटीचा संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 8 बाद 497 धावा (घोषित)
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 301 धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 6 बाद 186 धावा (घोषित)
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 197 धावा
सामनावीर – स्टिव्ह स्मिथ (पहिला डाव – 211 धावा, दुसरा डाव 82 धावा)
Australia have retained the men's Ashes!#Ashes | #ENGvAUS pic.twitter.com/ExLUMukTRn
— ICC (@ICC) September 8, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल
–…म्हणून संजू सॅमसनने मॅच फिचे दीडलाख रुपये दिले ग्राउंडस्टाफला
–यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद