भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील चौथा गाबा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाकडून रिषभ पंतने नाबाद 89 धावांची खेळी साकारून भारतीय संघाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने रिषभ पंतचे कौतुक केले आहे.
गाबा येथे खेळलेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 96.6 षटकात 7 गडी गमावून 329 धावा करून विजय मिळवला. या विजयात रिषभ पंतने धडाकेबाज 89 धावांची नाबाद खेळी करतांना विजयी चौकार ठोकून विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याचे बर्याच लोकांनी कौतुक केली आहे. स्टीव्ह स्मिथने सुद्धा रिषभ पंतचे कौतुक केले आहे.
स्टीव्ह स्मिथ हा रिषभ पंतचे कौतुक करताना म्हणाला, “त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे. जसे की आम्ही पाहिले, त्याने पाचव्या दिवशी खूपच शानदार खेळी केली. तो हा सामना आमच्यापासून दूर घेवून गेला. आम्ही क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅट मध्ये पाहिले आहे की, तो किती चांगल्या पद्धतीने खेळतो. तो कुठून चेंडूला मारू शकतो. त्याची आजची खेळी खास होती. ”
गाबा येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने मोक्याच्या क्षणी फलंदाजीला येत, ऑस्ट्रेलिया गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना नाबाद 89 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 89 धावा केल्या. तसेच 96.6 षटकात विजयी चौकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने 32 वर्षांनी गाबा येथे पहिला विजय मिळविताना ऑस्ट्रेलिया संघाचे या मैदानावर असलेले वर्चस्व मोडीत काढले. त्याचबरोबर या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबरोबर चार सामन्याच्या बॉर्डर गावसकर मालिकेवर कब्जा केला. भारताने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत जिंकलेली दुसरी कसोटी मालिका आहे. या अगोदर भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय