---Advertisement---

“सध्या विराटपेक्षा मोठा कोणीच नाही”, स्मिथने दिली खुल्या दिलाने कबुली

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर 4 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. मागील पंधरा वर्षांपासून त्याने आपल्या कामगिरीने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. दिग्गजांच्या यादीत समाविष्ट असलेल्या विराटबाबत आता त्याचाच प्रतिस्पर्धी मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ याने अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

विराट कोहली यांना मागील पंधरा वर्षात भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य योगदान देताना अनेक महत्त्वाचा सामन्यांमध्ये आपला खेळ उंचावत शानदार विजय संघाला मिळवून दिले आहेत. त्याच्या याच कौशल्याचे स्मिथ याने कौतुक केले. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,

“सध्याच्या काळात विराट कोहलीसारखा मोठा खेळाडू नाही. अगदी महत्त्वाच्या सामन्यात तो आपल्या खेळाचा दर्जा उंचावतो आणि निकाल आपल्या बाजूने करतो.”

विराटने आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात आपले हे रूप दाखवले आहे. 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होबार्ट येथे त्याने 133 धावांची अशीच खेळी केली होती. त्यानंतर आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. नजीकच्या काळात विचार केल्यास मागील वर्षी टी20 विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिलेला.

विराट आणि स्मिथ यांच्या दरम्यान अनेकदा तुलना केली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये ही तुलना खास करून होताना दिसते. त्यामुळे स्मिथ याने केलेले हे कौतुक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे.

(Steve Smith Praised Virat Kohli On His Greatness)

हेही वाचा-
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---