---Advertisement---

संघाबरोबर बसने न जाता ३ किलोमीटर पळत हॉटेलवर परतला स्टिव्ह स्मिथ, जाणून घ्या कारण

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2019 8:35 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान ब्रिस्बेन येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र हा सामना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथसाठी खास ठरला नाही.

स्मिथ या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केवळ 4 धावांवर बाद झाला. त्याला पाकिस्तानचा गोलंदाज यासिर शहाने त्रिफळाचित केले. स्मिथच्या या निराशाजनक कामगिरीनंतर त्याने चक्क स्वत:लाच शिक्षा करुन घेतली.

स्मिथ शिक्षा म्हणून मैदानातून संघाबरोबर बसने हॉटेलवर जाण्याऐवजी 3 किलोमीटर पळत हॉटेलवर परतला.

याबद्दल cricket.com.au शी बोलताना स्मिथ म्हणाला, ‘जेव्हा मला धावा करता येत नाही तेव्हा मी नेहमीच शिक्षा करतो, जसे मी चांगली कामगिरी केल्यावर स्वत:ला बक्षीस देतो. जेव्हा मी शतक करतो तेव्हा मी त्या रात्री स्वत:ला चॉकलेट बार बक्षीस देतो. जर मी धावा नाही केल्या तर मी धावण्याची किंवा जिमला जाण्याची शिक्षा करतो.’

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान विरुद्धचा दुसरा कसोटी सामना 29 नोव्हेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---