भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसर्या सामन्याला शनिवारी (26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे हा सामना मेलबर्न मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नॅथन लायन आणि स्टीव्ह स्मिथ एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात स्टीव्ह स्मिथने नॅथन लायनच्या एका प्रश्नाचे मजेदार उत्तर दिले आहे.
स्टीव्ह स्मिथ हा आधुनिक क्रिकेटचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो नेहमी नेटमध्ये आपल्या शॉटवर सराव करत असतो. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाने एकदा सांगितले होते की, त्याची बॅट नेहमी त्याच्या रूममध्ये असते आणि एकदा रिकी पाँटिंग सर्व खेळाडूंची रूम चेक करत होते, तेव्हा त्यांना स्मिथची बॅट आढळली. त्यावेळी पाँटिंग यांनी त्याला विचारले होते, तू सकाळी सात वाजता सुद्धा सराव करतो का? उत्तर देताना स्मिथ हो म्हणाला होता. मात्र, स्मिथ खरंच सात वाजता सराव करतो.
दुसर्या कसोटी सामन्यात पूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन लायन हे चर्चा करत होते. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या अधिकृत ब्रॉडकास्टर 7 क्रिकेटने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला नाव देण्यात आले आहे ‘टीम बाँडिंग सिरीज’. ऑस्ट्रेलियाच्या या दोन खेळाडूनी चर्चेत एकमेकांना काही हलके – फुलके प्रश्न विचारले आहेत.
नॅथन लायनने यामध्ये स्टीव्ह स्मिथला एक प्रश्न विचारला की, क्रिकेट खेळताना तुला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो? यावर उत्तर देताना स्टीव्ह म्हणाला, “जेव्हा दिवस संपतो आणि मला माझे किट बॅग भरावे लागते.” क्रिकेट विश्वात स्टीव्ह आणि मार्नस लॅब्यूशाने हे दोघे नवे विश्वासू फलंदाज आहेत.
स्टीव्ह स्मिथची भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 80 ची सरासरी आहे. परंतु स्मिथ पहिल्या कसोटी सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तो फक्त 1 धावसंख्येवर बाद झाला आणि दुसर्या डावात 1 धावेवर नाबाद राहिला. मात्र, तो दुसर्या कसोटी सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरेल.
ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल नसणार- जस्टीन लॅंगर
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्याचबरोबर भारतीय संघाला सर्वात कमी 36 धावांवर गुंडाळले गुंडाळले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी याच प्लेईंग इलेव्हनसोबत दुसर्या सामन्यात उतरणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघात कोणताही बदल बघायला मिळणार नाही.
दुसर्या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल
दुसर्या बाजूला मात्र वेगळी परिस्थिती आहे. भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यासाठी चार बदल केले आहेत. भारतीय संघात पृथ्वी शाॅच्या जागी शुबमन गिलला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. त्याचबरोबर मोहमद शम्मीच्या जागी मोहमद सिराजला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून साहाच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ व्यक्तीमुळे मोहम्मद आमिरने घेतली निवृत्ती; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा
‘केएल राहुलला संघाबाहेर पाहून दुःख होते’, भारताच्या माजी फलंदाजाची प्रतिक्रिया
क्रिडा विश्वावर शोककळा! १०३ शतके ठोकणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू काळाच्या पडद्याआड