ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या नव्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. स्मिथला मॅट रेनशॉ (Matt Renshaw) आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट ( Cameron Bancroft) यांच्या अगोदर सलामी फलंदाजी करण्यास पसंती देण्यात आली आहे. (steve smith reveals reason behind his decision to play as an test opener for australia)
सिडनी थंडरविरुद्धच्या बीबीएल सामन्यादरम्यान बोलताना स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला की, “मी यापूर्वीही ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि कर्णधाराला अनेकदा ओपनिंगसाठी विचारले आहे. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन नंबर 4 साठी योग्य असल्याचेही त्याने सांगितले.” स्मिथने भारताविरुद्धच्या टू20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सलामीवीराची भूमिका बजावली होती, परंतु याशिवाय त्याने इतर दोन फॉरमॅटमध्ये कधीही सलामीला फलंदाजी केली नाही.
ऑस्ट्रेलियन फलंदाज म्हणाला, “डेव्हिड वॉर्नरची जागा कोण घेणार याविषयी बरीच चर्चा झाली. अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) आणि पॅट कमिन्स ( Pat Cummins) यांच्याशी बोलताना ते त्यांचे सर्वोत्तम सहा फलंदाज खेळण्यास इच्छुक आहेत. यापूर्वीही अनेकदा माझे नाव घेण्यात आले होते. मी सलामी फलंदाजीबद्दल गंभीर होतो. निर्णय माझ्या बाजूने आल्याने बरे वाटले. ग्रीन क्रमांक 4 साठी योग्य आहे.”
स्मिथ पुढे म्हणाला, “मला वाटते की, मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) याने नंबर 3 स्थानावर स्वतःचे नाव भक्कम केले आहे. त्या जागेवर त्याने चमकदार कामगिरी केली आहे. मी चौथ्या क्रमांकावर खेळायचो, त्यामुळे मला खूप वाट पहावी लागली. बरं, मी आता मागे वळून पाहणार नाही. जेव्हा तुम्ही डावाला सुरुवात करता तेव्हा तुम्ही मैदानावर जाता आणि तुमच्या कामात व्यस्त होता.”
स्मिथने सिडनी सिक्सर्सकडून सलामीला फलंदाजी करताना खाते न उघडताच बाद झाला. मात्र, त्याच्या संघाने हा सामना 19 धावांनी जिंकला. (I can’t wait Steve Smith’s big reaction to his new role in the team)
हेही वाचा
द्रविडला टाळणं इशानला पडलं महागात; प्रशिक्षकाने दाखवला थेट बाहेरचा रस्ता, वाचाच
विराट-रोहितला बाबरपासून मोठा धोका, टी-20 मधील मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत