आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ 8 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये(सीपीएल) खेळणार आहे.
तो या लीगमध्ये बार्बाडोस ट्रीडेंट्स संघाकडून शाकिब अल हसन ऐवजी खेळणार आहे. याबद्दल आयोजकांनी माहिती देताना सांगितले की बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन अनुपलब्ध असल्याने त्याच्या ऐवजी स्मिथ सीपीएलमध्ये खेळेल.
बार्बाडोस ट्रीडेंट्सचे प्रशिक्षक रॉबिन सिंग म्हणाले, ‘शाकिब संघात नसल्याने नक्कीच त्याची कमतरता भासेल परंतू जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी असलेला स्मिथ संघाच्या फलंदाजीला मजबुती देईल.’
स्मिथबरोबरच या लीगमध्ये आॅस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही खेळणार आहे. तो सेंट लुसिया स्टार्स संघाकडून आॅस्ट्रेलियाच्याच डॉर्सी शॉर्टचा बदली खेळाडू म्हणून खेळेल.
स्मिथ आणि वॉर्नर मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते.
त्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून 1 वर्षासाठी निलंबित केले आहे. त्यामुळे आयपीएलनेही त्यांच्यावर यावर्षी खेळण्यासाठी बंदी घातली होती.
यावर्षीचा सीपीएलचा हा सहावा मोसम असून 8 आॅगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. तसेच बार्बाडोस ट्रीडेंट्सचा पहिला सामना 11 आॅगस्टला गयाना ऍमेझॉन वॉयियर्स विरुद्ध होणार आहे.
स्मिथ नुकताच ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये खेळला होता. मात्र त्याला या लीगमध्ये विशेष काही करता आले नव्हते. त्याने या स्पर्धेत 33.40 च्या सरासरीने 167धावा केल्या होत्या.
तसेच स्मिथने आत्तापर्यंत 155 टी20 सामने खेळले असून यात 30.03 च्या सरासरीने 3124 धावा केल्या आहेत.
BREAKING NEWS : Steve Smith joins @BIMTridents for #CPL18 Welcome to the party @stevesmith49 Read more ➡️ https://t.co/fWm4O0g0hN #BiggestPartyInSport pic.twitter.com/lcRCWJiZ4R
— CPL T20 (@CPL) July 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–युवा खेळाडू पवन शहाने हा विक्रम करत गंभीर, पुजारालाही टाकले मागे
–कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतो तब्बल ८० लाख रुपये तर ख्रिस्तीयानो रोनाल्डो…
–निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल