वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीजला दोन कसीट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहे. उभय संघात होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी सलामी फलंदाज म्हणून संघाचा दिग्गज खेळा़डू स्टीव स्मिथ याला संधी मिळाली आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) याने नुकतीच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृती घेतली आहे. निवृत्तीनंतर मागील ऑस्ट्रेलिया संघातील सलामी फलंदाजाची जागा रिकामी झाली होती. मागील अनेक दिवसांपासुन या जागी स्टिव स्मिथ (Steve Smith) याला संधी द्यावी की आणखी कुणाला खेळवावे यावर खुप चर्चा सुरू होती. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. संघ व्यवस्थापनाने बुधवारी(10 जानेवारी) वेस्टइंडीजविरुद्द होणाऱ्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. यामध्ये मार्कस हैरिस आणि कैमरोन ब्रेनक्राफ्ट यांना यावेळी संधी मिळाली नाही. मैथ्यू रेनशॉ यावेळी संघाचा भाग असेल.
याअगोदर स्टीव स्मिथने पाकिस्तान दौऱ्यानंतर सलामी फलंदाज म्हणून खेळण्याची इच्छा बोलुन दाखवली होती. यावेळी आपल्या कारकिर्दीत स्मिथ पहील्यांदा सलामी फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. सलामीवीर म्हणून त्याला उस्मान ख्वाजा याच्यासोबत डावाची सुरुवात करायची आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीला देखील स्मिथचा हा निर्णय आवड्याचे जिसते. आगामी मालिकेत तो कसोटी कारकिर्दीत पहिल्यांता सलामीला खेळताना दिसू शकतो. याआधी त्याने क्रमांक तीन ते नऊ पर्यंत फलंदाजी केली आहे. पण एकही कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून खेळला नाहीये.
Time to welcome the Windies.
Matt Renshaw returns to our men’s national squad, with Cam Green named a certain starter for the first Test in Adelaide. pic.twitter.com/cdprTbiiyE
— Cricket Australia (@CricketAus) January 10, 2024
(Steve Smith will replace David Warner as Australia’s opener in the upcoming series)
हा आहे आस्ट्रेलियाचा कसोटी संघ
पैट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रिन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड(उपकर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिचेल मार्श, मैथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ आणि मिचेल स्टार्क.
महत्वाच्या बातम्या –
मुजीब, फजल अन् नवीनचा परदेशी लीग खेळण्याचा मार्ग मोकळा, अफगाणिस्तान बोर्डाने उठवली बंदी
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारे ‘5’ फलंदाज