आयपीएल 2023चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. गुजरातने या सामन्यात पाच विकेट्स राखून चेन्नईला पराभवाची धूळ चारली. मात्र, गुजरातचा महत्वाचा खेळाडू केन विलियम्सन मात्र दुखापतग्रस्त झाला. विलियम्सनची दुखापत गंभीर असल्यामुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून त्याने माघार गेतली. आता त्याची जागा भरण्यासाठी ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ याचे नाव चर्चेत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये स्टीव स्मिथ (Steve Smith) समालोचन करताना दिसला आहे. पण विलियम्सनला दुखापत झाल्यानंतर स्मिथ पुन्हा एकात आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आयपीएल 2023साठी खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात स्टीव स्मिथ अनसोल्ड राहिला होता. स्मिथ 2 कोटी बेस प्राईजसह लिलावात उतरला होता. पण त्याला खरेदी करण्यासाठी एकही संघ इच्छुक दिसला नाही. लिलावापूर्वी स्मिथचा खराब फॉर्म यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसले. असे असले तरी, विलियम्सनच्या दुखापतीनंतर स्मिथला आयपीएलमध्ये पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरात आणि सीएसके यांच्यातील हा सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 178 धावा केल्या. चेन्नईच्या डावातील 13 व्या षटकात केन विलियम्सन (Kane Williamson) दुखापतग्रस्त झाला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना विलियन्सनला एक चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली. विलियम्सनची जागा भरून काठम्यासाठी गुजरात स्टीव स्मिथचा नक्कीच विचार करेल. स्मिथचा आयपीएमधील अनुभव मोठा असल्याने संघात त्याची वर्णी लागू शकते.
स्मिथने आतापर्यंत 103 आयपीएल सामने खेळले आहेत. यापैकी 93 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली. आयपीएलमध्ये त्याची सरासरी 34.51 राहिली असून 128.09च्या स्ट्राईक रेटने 2485 धावा केल्या आहेत. यादरम्यान 1 शतक आणि 11 अर्धशतके त्याने ठोकली. 101 ही स्मिथची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच भारताविरुद्धची वनडे मालिका स्मिथच्याच नेतृत्वाच जिंकली. (Steve Smith’s name is being discussed to replace the injured Kane Williamson in Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत खूप अहंकारी…’, आयपीएल न खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना इम्रान खानकडून धीर
केकेआर-पंजाब सामन्यात पंचांचा उडाला गोंधळ! नवव्या षटकात असं काय घडलं?