चेंडू छेडछाड प्रकरणाने क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनीच असा लाजिरवाणा प्रकार केल्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष वेधले गेले.
क्रिकेटऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १ वर्षांची बंदी घातली आहे तर कॅमेरॉन बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे हे खेळाडू परत ऑस्ट्रेलियाला परतले आहेत.
परत जाताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला विमानतळावर पूर्ण सुरक्षेमध्ये घेऊन जाण्यात आले. पण त्याच्या भोवती सुरक्षेसाठी ज्या प्रकारे पोलिसांचा गराडा होता ते पाहून अनेकांचे हृदय पिळवटले होते. तसेच त्यानंतर ऑस्ट्रलियात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्मिथला रडू आवरता आले नव्हते.
या गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही आज ट्विटरवरून जे झाले ते चुकीचेच होते. पण त्याचे वाईट वाटल्याचे म्हटले आहे.
त्याने ट्विट वरून एक फोटो शेयर केला होता ज्यात त्याने त्याची मते व्यक्त केली आहेत. त्याने यात म्हटले आहे की, “स्टीव्ह स्मिथच्या विमानतळावरील आणि नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओने मला वाईट वाटले.”
“खिलाडूवृत्ती ही सर्वात महत्वाची आहेच आणि ते कोणीही अमान्य करत नाही. त्यांनी (स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रोफ्ट) चूक केली आणि ती मान्यही केली. मी इथे बसून बोर्डाच्या निर्णयावर प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल पण ते चांगले खेळाडू आहे. या प्रकरणावरून त्यांच्याविषयी मत तयार करू नका.”
— Rohit Sharma (@ImRo45) March 29, 2018