भारत आणि ऑस्ट्रेलिया संघारम्यान सध्या कसोटी मालिका सुरू असून , संपूर्ण ऑस्ट्रेलियाचे वातावरण क्रिकेटमय झाले आहे. अनेक आजी-माजी खेळाडू समालोचन करतांना भारताविरुद्ध आपल्याला आलेले अनुभव स्पष्ट करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार स्टीव वॉ यांनी भारताविरुद्धचे आपले अनुभव मांडतांना स्पष्ट केले की , राहुल द्रविड हे जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते, व ऑस्ट्रेलियन संघात द्रविड बद्दल भीतीचे वातावरण असायचे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलद्वारे वॉ यांचा व्हिडिओ शेयर केला आहे. वॉ यांनी राहुल द्रविड यांना जगातील उत्तम खेळाडूंपैकी एक मानले आहे. वॉ यांनी स्पष्ट केले की राहुल द्रविड भारतीय संघासाठी तितकेच महत्त्वाचे होते, जितके सचिन तेंडुलकर यांचे होते. ऑस्ट्रेलियन संघामध्ये राहुल द्रविड यांच्या बद्दल मोठा दरारा निर्माण झाला होता असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी 2001 मधील ऐतिहासिक कोलकत्ता कसोटीचीही माहिती दिली, ज्यात फॉलोऑन मिळाल्यानंतरही भारतीय संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
वॉ यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध राहुल द्रविड यांनी खेळलेल्या काही उत्तम डावांची माहिती दिली आहे. वॉ पुढे म्हणाले की द्रविड हे एक उत्तम फलंदाज होते .त्यांनी प्रत्येक संघाविरुद्ध कठीण परिस्थितीमध्ये धावा केलेल्या आहेत. द्रविड यांचा बचाव सर्वोत्तम होता असेही वॉ यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी- श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातील ‘या’ खेळाडूचा रिपोर्ट आला कोरोना पाॅझिटिव्ह
एका शब्दात रोहितची ओळख..? चाहत्याच्या प्रश्नावर पाकिस्तानी दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर






