---Advertisement---

मन जिंकलंस लेका! अवघ्या ९ वर्षीय मुलाची प्रतिभा पाहून दिग्गज स्टीव्ह वॉ देखील दंग; मानले आभार

---Advertisement---

भारत देशात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. गल्लीबोळात, मोठमोठ्या इमारतीच्या आवारात, मैदानात किंबहुना मिळेल त्या जागेत क्रिकेट खेळणारी मुले आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी बहुसंख्य मुले ही स्वतःहूनच क्रिकेट खेळायला शिकतात तर काहींना प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक वर्ग लाभतो. बऱ्याचदा या प्रतिभाशाली चिमुकल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आजी-माजी क्रिकेटपटूही पुढाकार घेताना दिसतात. याचाच एक प्रत्यय नुकताच आला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि क्रिकेटविश्वातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले स्टिव्ह वॉ यांनी एका ९ वर्षीय मुलाचे आभार मानले आहेत. त्या मुलाचे नाव शायान जमाल असे आहे.

त्याचे झाले असे की, २ जून रोजी स्टिव्ह यांनी त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शायानने ‘वाढदिवस विशेष चॅलेंज’ घेत स्टिव्ह यांच्यासारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळचा व्हिडिओ त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओत तो घराच्या खोलीमध्ये दमदार फटकेबाजी करताना दिसत होता.

https://www.facebook.com/shayanjamal.sj/videos/198574288790557/

शायानच्या या व्हिडिओवर स्वत: स्विव्ह यांनी प्रतिसाद देताना लिहिले की, ‘खूप खूप आभार शायान. स्विव्हकडून तुला शुभेच्छा.’

महत्त्वाची बाब अशी की, स्विव्ह आणि शायान यांचे संबंध खूप जवळचे असल्याप्रमाणे आहेत. शायान याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी १२ वर्षांखालील शालेय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. तो सध्या ९ वर्षांचा असून १४ वर्षांखालील संघाकडून क्रिकेट खेळतो. त्याला स्टिव्ह यांचे मार्गदर्शनही लाभले आहे.

Steve Waugh Come to Meet Shayan  Part 1 #shayanjamal #stevewaugh #indiancricket #cricketaustralia

शायान जमालच्या यूट्यूब चॅनलवर त्याचे स्टिव्ह वॉ यांच्याकडून फलंदाजीचे धडे गिरवतानाचे व्हिडिओ आहेत. एवढ्या कमी वयात लक्षवेधी फटके मारणाऱ्या शायानचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याच्या प्रदर्शनावरुन दिसते.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रवीण कुमारने शेअर केला सहकाऱ्यांसोबतचा जुना फोटो; चाहते म्हणाले, ‘वो दिन भी क्या दिन थे’!

ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!

नंबर १ फॅनगर्ल! विराटसाठी ओलांडल्या होत्या सर्व सीमा; म्हणाली, ‘कृपया मला कोहली द्या’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---