---Advertisement---

“अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 11:43 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी मालिका सुरू असून, यावेळी अनेक माजी खेळाडू आपल्या खेळण्याच्या काळाची आठवण सांगत आहेत. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार स्टीव वॉ यांनी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांची स्तुती केली आहे. वॉ यांनी कुंबळे यांना राहुल द्रविड प्रमाणे एक कणखर व संपूर्ण समर्पण दाखवणारा प्रतिस्पर्धी मानले आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला दिलेल्या मुलाखतीत वॉ म्हणाले, “कुंबळे एक कठोर प्रतिस्पर्धी होते. ते प्रत्येक वेळी तुमच्यावर दडपण बनवण्यासाठी प्रयत्न करत असायचे. कुंबळेंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब गोलंदाजी केल्याचे मला आठवत नाही. ते गोलंदाजी विभागाचे राहुल द्रविड होते.”

वॉ पुढे म्हणाले, “मी असा एकही खेळाडू बघितला नाही ज्याने देशाकडून खेळण्यात कुंबळेंइतका आनंद मिळवला. आम्ही कुंबळेंना निश्चितच एक मिडीयम पेसर म्हणून खेळले, लेग स्पिनर म्हणून नाही. त्यांच्याकडे गतीमध्ये बदल करण्याचे एक उत्तम शस्त्र होते. खेळपट्टीतुन थोडीशी जरी मदत मिळत असेल तर कुंबळे अतिशय घातक गोलंदाजी करायचे.”

महत्वाच्या बातम्या:

SL vs ENG : इंग्लंडच्या दमदार गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजी ढेपाळली, पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाचे वर्चस्व

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी

अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---