भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) साठी हा सामना खास आहे, कारण कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा १०० वा सामना असणार आहे. हा सामना खेळण्यासाठी विराट मैदानात उतरण्यापूर्वी त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी त्यांची महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहली आज त्याचा १०० कसोटी सामना खेळत आहे, या प्रवासाची सुरुवात त्याने २०११ मध्ये केली होती, जेव्हा त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती. राजकुमार शर्मा म्हणाले की, ‘मला आजही तो दिवस लक्षात आहे, जेव्हा तो पहिल्यांदा माझ्या क्रिकेट अकादमीत आला होता. तो एक खोडसाळ मुलगा होता. खूप उत्साही आणि खेळण्यासाठी उत्सुक होता. त्याला प्रशिक्षण देताना असे वाटले की, त्याच्यात खूप जास्त क्षमता आहे आणि तो दुसऱ्यांपेक्षा वेगळा होता. मला आजही २०११ सालचा तो दिवस लक्षात आहे, जेव्हा त्याने मला फोन केला आणि म्हणाला की, त्याला भारतीय संघात निवडले गेले आहे.’
‘तो खूप भावूक क्षण होता आणि आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि आता अखेर तो तो १०० वा कसोटी सामना खेळत आहे. हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण माझा एक विद्द्यार्थी भारतासाठी त्याचा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. मी त्याला त्याचा आगामी सामन्यांसाठीही शुभेच्छा देतो’, असे राजकुमार शर्मा पुढे बोलताना म्हणाले.
कसोटी क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने, ही खेळणे सोपी कामगिरी नाही, आत्तापर्यंत भारताच्या केवळ ११ दिग्गजांनी ही कामगिरी विराटच्या आधी केली आहे. यापूर्वी दिग्गज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग या दिग्गजांनी कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळले आहेत. विराट या यादीत १२ वा खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ ची जाहिरात लॉन्च! पाहा धोनीचा ‘जबरा स्वॅग’
कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद
मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड