इंडियन प्रीमिअर लीग 2020 मधील 50 वा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सहजपणे विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. या विजयानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाच्या योजनेबद्दल माहिती दिली आणि अष्टपैलू बेन स्टोक्सचे कौतुकही केले.
सहजपणे मिळवला विजय
नाणेफेक जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबला 185 धावांवर रोखल्यावर राजस्थानने अवघ्या 17.3 षटकांत 7 गडी राखून अगदी सहजपणे विजय मिळवला. या विजयासह राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे.
योजनेनुसार घेतला जातो निर्णय
“संघ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परत येत आहे. आम्ही याआधी काही सामन्यात विजय मिळवला असता तर बरे झाले असते. योग्य वेळी संघ लयमध्ये परतला आहे. आता आम्हाला चांगले प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे. बटलरबाबत संघाची एक योजना आहे. संघात कुणाला संधी द्यायची आणि कुणाला संघाबाहेर ठेवायचं याचा निर्णयही योजनेनुसारच घेतला जातो.”
….म्हणून जॉस बटलरला 5 व्या क्रमांकावर दिली संधी
सलामीवीर जॉस बटलर आता 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. या क्रमांकावर त्याला अधिक संधी मिळालेली नाही. याबद्दल बोलताना कर्णधार स्मिथ म्हणाला की, “मागील सामन्यात बटलरला खेळण्याची संधी मिळाली नाही, म्हणून आम्ही त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. सामना सहजपणे जिंकून आनंद झाला.त्यामुळे आमच्या नेट रनरेटमध्ये सुधारणा झाली. गेल्या दोन सामन्यात बेन स्टोक्सने चांगली खेळी केली. त्याने त्याच्या खेळात बदल केले आहेत.”
बेन स्टोक्सचे केले कौतुक
कर्णधार स्टीव्ह स्मिथ अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे कौतुक करताना म्हणाला की, “बेन स्टोक्स जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आपण नेहमीच खेळाडूंशी चर्चा करतो आणि त्यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळीची अपेक्षा करतो जर तो मैदानावर अधिक काळ टिकला, तर संघाचा विजय होईल हे आम्हाला ठाऊक आहे. आमचे लक्ष आता आगामी सामन्यांकडे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आर्चरकडे खरंच टाईममशीन आहे? ७ वर्षांपूर्वी ट्विटरवरुन केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी
अब आएगा मजा!! ३ जागा, ६ संघ आणि ६ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे
ट्रेंडिंग लेख
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…