इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची मंगळवारी (14 आॅगस्ट) नाइटक्लब मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
त्यामुळे त्याचा भारताविरुद्ध 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याची ही निवड तो निर्दोष असल्याचा निकाल आल्यानंतर दोन तासाच्या आतच करण्यात आली.
स्टोक्सची या प्रकरणाबद्दल मागील सहा दिवस न्यायालयीन सुनावणी सुरु होती. त्यामुळे स्टोक्सला 9 ते 12 आॅगस्ट दरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते.
लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी स्टोक्सच्या ऐवजी ख्रिस वोक्सला संधी देण्यात आली होती. वोक्सनेही या संधीला दवडले नाही. त्याने या सामन्यात 4 विकेट आणि शतक असा अष्टपैलू खेळ करत संघातील स्थान पक्के केले.
तसेच इंग्लंडने 13 आॅगस्टलाच तिसऱ्या कसोटीसाठी 13 जणांच्या संघाची निवड केली होती. पण त्यावेळी स्टोक्सची न्यायालयीन सुनावणी सुरु असल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. परंतू आता तो कायद्याच्या कचाट्यातून सुटल्याने त्याचा संघातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला.
स्टोक्सने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चांगला खेळ केला होता. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या मुख्य विकेट घेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
तिसऱ्या कसोटीसाठी असा असेल इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉश बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, जिमी पोर्टर, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता
–सचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा?