कोण ठरणार वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू? यंदा एकही भारतीय नाही शर्यतीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. 2022 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू या पुरस्काराची नामांकने शुक्रवारी (30 डिसेंबर) जाहीर केली गेली. सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू व सर्वोत्तम क्रिकेटपटू या विभागाप्रमाणे सर्वोत्तम कसोटीपटू या विभागातही कोणत्याही भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले नाही.
Presenting the nominees for the ICC Men's Test Cricketer of the Year 2022 🤩
💫 A fierce pacer
💥 An all-round genius
🌟 Two exceptional batters#ICCAwards | Details ⬇️— ICC (@ICC) December 30, 2022
आयसीसीने मागील तीन दिवसांपासून विविध पुरस्कारांसाठीची नामांकने जाहीर केली. यातील 2022 वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू या पुरस्काराची नामांकने शुक्रवारी घोषित केली गेली. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, इंग्लंडचाच जॉनी बेअरस्टो, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा यांचा यामध्ये समावेश आहे.
बेन स्टोक्स याने यावर्षीच इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर संघाला 10 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून दिले. त्याने या वर्षभरात 15 कसोटी सामने खेळताना दोन शतके व 4 अर्धशतकांच्या मदतीने 870 धावा केल्या. तसेच 26 बळीही त्याच्या नावे जमा आहेत. इंग्लंडच्या याच यशात सर्वाधिक वाटा हा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो याचा राहिला. ऑगस्ट महिन्यात दुखापतग्रस्त होण्याआधीच त्याने 10 सामन्यातच 66.61 च्या अविश्वसनीय सरासरीने 6 शतकांसह 1061 धावा कुटलेल्या. त्याने ज्या प्रकारे आक्रमक खेळ दाखवला त्यामुळे इंग्लंड संघाचे एक वेगळे रूप सर्वांना दिसून आले.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्यासाठी देखील हे वर्ष तितकेच लाभदायी ठरले. पुनरागमानानंतर त्याने 11 कसोटी सामन्यांमध्ये 67 पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेट 1080 धावा जमवल्या. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा देखील तितकाच यशस्वी ठरला. 9 सामन्यात 47 बळी मिळवताना त्याने भारत, इंग्लंड व न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.
(Stokes Bairstow Rabada And Khawaja Nominated For ICC Test Cricketer Of The Year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
आयपीएलच्या इतिहासात ‘या’ खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर