इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71 वी ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील रोमहर्षक झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी(25 ऑगस्ट) इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडने या मालिकेतील आव्हानही कायम ठेवत 1-1 अशी बरोबरी केली.
इंग्लंडच्या या विजयाचा शिल्पकार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स ठरला. त्याने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची शतकी खेळी केली. तसेच शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला. या भागीदारीमध्ये लीचने 17 चेंडू खेळताना केवळ 1 धावेचे योगदान दिले होते.
इंग्लंडने विजयासाठी 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची 9 वी विकेट 289 धावांवर असताना गमावली होती. या परिस्थितीतून इंग्लंडला बाहेर काढण्याचे शिवधनुष्य पेलत स्टोक्सने या सामन्यात इंग्लंडला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.
त्यामुळे तिसऱ्या ऍशेस कसोटीनंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी बशली, टेवेक्सबरीजवळ एका रस्त्याला ‘सर बेन स्टोक्स’ असे नाव दिले आहे. हे नाव एका कार्डबोर्डवर लिहिलेले दिसून येत आहे. या लेनला आधी ‘स्टोक्स लेन’ असे नाव होते. पण नंतर स्टोक्सच्या पुढे चाहत्यांनी ‘सर बेन’ असे नाव लिहिले.
या मालिकेआधी स्टोक्सने इंग्लंडला 2019 विश्वचषक जिंकून देण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याला 14 जूलैला पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्यामुळे त्याने मागील दिडमहिन्यात इंग्लंडला दोन महत्त्वाचे विजय मिळवून दिले आहेत.
Joyous @englandcricket fans near #Tewkesbury have been showing their appreciation for @benstokes38's remarkable #Ashes innings at #Headingley. This is on the A438 near #Bushley. #bbccricket #ENGvAUS #SirBenStokes pic.twitter.com/9MuCRsXp4b
— BBC Gloucestershire (@BBCGlos) August 26, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: क्रिकेटचे असे समालोचन कधी पाहिले आहे का?
–भारताचा हा दिग्गज कर्णधार म्हणतो, टीम इंडियाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावायला हवी
–या कारणामुळे रोहितला मिळाली नाही ११ जणांच्या टीम इंडियात संधी, विराटने केला खूलासा