आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. 2022 या वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या पुरस्काराची नामांकने शुक्रवारी (30 डिसेंबर) जाहीर केली गेली. विशेष म्हणजे या वर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले नाही.
Top performers from 🇵🇰, 🏴, 🇿🇼, and 🇳🇿 feature in the Sir Garfield Sobers Trophy for Men’s Cricketer of the Year nominations 🌟#ICCAwards | Find out ⬇️
— ICC (@ICC) December 30, 2022
आयसीसीने मागील तीन दिवसांपासून विविध पुरस्कारांसाठीची नामांकने जाहीर केली. यातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयसीसी क्रिकेटर ऑफ द एरिया पुरस्कारासाठीची नामांकने सर्वात शेवटी घोषित करण्यात आली. या नामांकनांमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊदी व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना स्थान मिळाले. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात येईल.
बेन स्टोक्स याने यावर्षीच इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर संघाला 10 पैकी 9 सामन्यात विजेतेपद मिळवून दिले. त्याने या वर्षभरात तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 28 सामने खेळताना 1066 धावा व 33 बळी मिळवले. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही त्याने नाबाद अर्धशतक झळकावलेले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यासाठीही हे वर्ष चांगले ठरले. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारलेली. या वर्षभरात त्याने 44 सामन्यात 2598 धावा जमवल्या आहेत.
झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा हा या पुरस्कारासाठी नामांकित होणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. केवळ वनडे व टी20 क्रिकेटमध्ये त्याने 39 सामन्यांत 1380 धावांसह 33 बळी आपल्या नावे केले आहेत. तर, चौथा नामांकित ठरलेला न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊदी हा या वर्षात गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम ठरला. त्याने केवळ 31 सामन्यात 65 बळी टिपले आहेत.
(Stokes Southee Raza And Babar Nominated For ICC Player Of The Year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
आयपीएलच्या इतिहासात ‘या’ खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर