---Advertisement---

सलग ५ चेंडूत ५ षटकार मारणाऱ्या शिवम दुबेबद्दल युवराज सिंग म्हणाला…

---Advertisement---

रविवारी(3 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यातून मुंबईच्या शिवम दुबेने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवमकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याची तुलना भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगशी केली जात आहे.

मात्र युवराजने या तुलनेबद्दल म्हटले आहे की तुलना करण्याची ही योग्य वेळ नाही कारण नुकतीच शिवमने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली आहे.

‘शिवमला प्रथम आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात करू दया आणि मग जेव्हा तो एखाद्या विशिष्ट पातळीवर पोहचेल तेव्हा त्याची तुलना एखाद्याशी करा. त्याची तुलना माझ्याशी केली पाहिजे असे मला वाटत नाही. त्यांने स्वतःची वेगळी ओळख मिळवायला पाहिजे. त्याच्याकडे प्रतिभा आहे’, असे युवराजने एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांना सांगितले.

शिवमला बांगलादेशविरुद्ध पदार्पण करताना खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात केवळ 1 धाव केली होती.

त्याआधी शिवमने मागीलवर्षी मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत बडोदाविरुद्ध सलग पाच चेंडूत पाच षटकार मारत चाहत्यांचे मन जिंकले होते. या कामगिरीनंतर तो प्रकाशझोतात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

https://twitter.com/Maha_Sports/status/1192363309212717058

https://twitter.com/Maha_Sports/status/1192354964984623104

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---