एशियन गेम्स २०१८ स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. येत्या १८ ऑगस्टपासून या स्पर्धेला जकार्ता येथे सुरवात होत आहे.
एशियन गेम्समध्ये कबड्डी हा भारतासाठी असा एकमेव खेळ आहे, ज्यामध्ये भारतचे सुवर्ण पदक कोणीही खेचू शकत नाही.
१९९० ला एशियन गेम्समध्ये कबड्डी खेळाचा प्रथम समावेश झाला. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारताने यामध्ये सुवर्ण पदक जिंकत आपला दबदबा कायम राखला आहे.
जकार्ता मध्ये होणाऱ्या या एशियन गेम्समध्ये भारतीय संघ आपले ८ वे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
भारतीय संघाकडे राहुल चौधरी, प्रदिप नरवाल, अजय ठाकूर, रिशांक देवाडिगा, रोहित कुमार आणि मोनू गोयत यांच्या रूपाने आक्रमक रेडर्स आहेत.
तर गिरीश ऐरनाक, मनजीत चिल्लर, सुरेंदर नाडा आणि दिपक हुड्डा हे तगडे बचावपटू आहेत.
या भारतीय कबड्डीपटूंमधील मोनू गोयत, रिशांक देवाडीगा, दिपक हुड्डा आणि राहुल चौधरी हे २०१८ प्रो-कबड्डी लिलावात करोडपती झाले आहेत.
या देशांचे भारतासमोर असणार तगडे आव्हान
एशियन गेम्समध्ये भारता समोर यावेळी पाकिस्तान, ईरान, बांगलादेश, जापान आणि दक्षिण कोरिया सारख्या संघांचे तगडे आव्हान असणार आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये अनेक विदेशी खेळाडू गेल्या काही वर्षांपासून खेळत असल्याने विदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या कमजोरीची जाणीव झाली आहे.
त्यामुळे भारतासमोर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त मोठे आव्हान असणार आहे.
गेल्या काही काळात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विरोधी संघानीं जोरदार टक्कर दिली आहे. मात्र त्यामध्ये ते भारतावर वर्चस्व गाजवण्यात अपयशी ठरले आहेत.
तसेच एशियन गेम्ससाठी भारतीय कबड्डी चाहतेही उत्सुक आहेत. त्यामुळेच भारतीय चाहते आपल्या संघाला चेअर करण्यासाठी सोशल मिडियावर ‘रेड फॉर गोल्ड’ ही मोहिम राबवत आहेत.
सोशल मिडिया वर ‘रेड फॉर गोल्ड’
कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि मशाल स्पोर्ट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी ‘रेड फॉर गोल्ड’ मोहिम सुरु केली आहे. कबड्डी प्रेमी रेड फॉर गोल्ड डॉट कॉम वेबसाइट वर जाऊन भारतीय संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश देऊ शकतात.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?