आयपीएलमध्ये सोमवारी (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईने खराब फलंदाजी केली. अष्टपैलू रवींद्र जडेजाव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक काळ टिकता आले नाही. दुसऱ्या डावात गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत नाही असे या पराभवानवर बोलताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने सांगितले.
या पराभवानंतर चेन्नईच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा आता जवळपास संपल्या आहेत.
दुसर्या डावात खेळपट्टीवर गोलंदाजांना मिळाली नाही मदत
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, “पहिल्या डावात खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. मी रवींद्र जडेजाला गोलंदाजी दिली कारण तो धावा रोखू शकतो का हे मला पहायचे होते. पहिल्या डावात गोलंदाजांना जशी मदत मिळाली तशी दुसऱ्या डावात मिळाली नाही. फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर गोलंदाजी देऊ असे मला वाटले. माझ्या मते दुसर्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधीच होतं नाही.”
…..तर दबाव येत नाही
पुढे बोलताना धोनी म्हणाला, “तुम्ही केलेल्या यशस्वी प्रयत्नांना यश म्हणतात. आपला निकाल आपल्याला सकारात्मक विचार करण्यास भाग पडते. कोट्यावधी लोकांसमोर खेळताना तुम्ही काहीच लपवू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की जर आपण योग्य प्रक्रियेने कार्य केले असेल तर ड्रेसिंग रूममध्ये असताना निकालाचा दबाव येत नाही. आम्ही या सामन्यात काही बदल केले नाहीत कारण 4-5 सामन्यानंतर खेळाडू कशी कामगिरी करतो हे कोणीच सांगू शकत नाही.”
तरुण खेळाडूंना देऊ संधी
“हे खरं आहे की या हंगामात आम्ही काही खास कामगिरी करू शकलो नाही. तरुण खेळाडूंची चमक आपण पाहिलेली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात आम्ही तरुण क्रिकेटपटूंना संधी देऊ, त्यांच्यावर कोणताही दबाव असणार नाही. जेणेकरून ते मैदानावर मुक्तपणे खेळू शकतील आणि आमच्याकडे अधिक पर्याय असेल.” असेही पुढे बोलताना धोनी म्हणाला.