कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताने ज्यूडोमध्ये तिसरे पदक मिळवले आहे. तुलिका मान हिने ज्यूडोमध्ये देशाला तिसरे पदक जिंकून दिले आहे. २३ वर्षीय तुलिकाला अंतिम सामन्यात स्कॉटलँडच्या सारा एडलिंग्टन हिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. तिच्या कॉमनवेल्थ गेम्समधील पदकापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकूया…
तुलिकाचा (Tulika Maan) कॉमनवेल्थमधील (Commonwealth Games 2022) पहिला सामना मॉरेशियाच्या ट्रेसी डुरहोन हिच्याविरोधात झाला होता. ७८ किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनी गटात तुलिकाने शानदार प्रदर्शन करत एक गुण मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तिने न्यूझीलंडच्या सिडनी एंड्यूस हिला काट्याची टक्कर दिली होती. इपॉनद्वारे तिने एक गुण मिळवलेला. परंतु पेनल्टीमध्ये तिने एक गुण गमावला होता. मात्र दोन्ही खेळाडूंनी गुण मिळवल्याने पेनल्टीच्या गुणाला महत्त्व दिले गेले नाही. पुढे तुलिकाने शिडोद्वारे आणखी एक अंक मिळवला होता.
याच प्रदर्शनाच्या जोरावर तिने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात ७८ किलो वजनाच्या गटात तुलिकाचा सामना स्कॉटलँडच्या सारा एडलिंग्टन हिच्यासोबत झाला. या सामन्यात तिने वजा-आरीद्वारे आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या मिनिटाला साराने इपॉन लावत सामना जिंकला. परिणामी तुलिकाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
What a fight!@MaanTulika narrowly misses out and secures silver in Judo +78 KG category.#EkIndiaTeamIndia #WeAreTeamIndia pic.twitter.com/hXonzsG3ax
— Team India (@WeAreTeamIndia) August 3, 2022
राष्ट्रीय पातळीवर जिंकलीत अनेक पदके
दरम्यान तुलिकाने राष्ट्रीय पातळीवर बरेच पदक जिंकले आहेत. जीवन कुमार शर्मा यांच्या देखरेखीखाली ज्यूडोची ट्रेनिंग घेणाऱ्या तुलिकाने विश्वचषकात एक कांस्य पदक जिंकले आहे. कनिष्ठ पातळीवर तिने २ कांस्य पदकही पटकावले आहेत. तसेच ज्यूनियर पातळीवर तिने युरोपियन चषकात एक सुवर्ण आणि राष्ट्रीय चँपियनशीपमध्ये एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर राष्ट्रीय चँपियनशीपमध्ये तिने २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
WIvsIND: रोहित-द्रविडच्या डोळ्यात खुपतोयं ‘हा’ खेळाडू, बनला आहे टीम इंडियाची मोठी कमजोरी
रोहित शर्माच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती, शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी उपस्थित राहणार?
CWG2022: तेजस्विन शंकरने जिंकले कांंस्य, उंच उडीत पदक जिंकणारा बनला पहिलाच भारतीय